धरणगाव, 26 मे : प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटनेच्या वतीने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दुसाने यांचा सन्मान करण्यात आला. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांचे हस्ते त्यांना आपल्या कार्याचा पुरस्कार आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली (रजि. भारत सरकार) या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांना महाराष्ट्र राज्यात संघटनेचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान आपल्या कार्याचा या पुरस्काराने गौरविण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांचे हस्ते त्यांना मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन गौरवण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली व शशिकांत दुसाने यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणगाव येथील हॉटेल अमोल रेसिडेन्सी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत संघटनेचे महत्त्व पटवून दिले. तसेच शशिकांत दुसाने म्हणाले की, सध्या स्थितीत समाजात अनेक समस्या आहेत. त्या समस्यांना अद्यापही न्याय मिळत नाही. अशावेळी मानवांच्या न्याय व हक्कासाठी मानव अधिकार संघटना महत्त्वाची भूमिका बजावते, या शब्दांत त्यांनी आपले विचार मांडले.
दरम्यान, संघटनेतील धरणगाव तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र वाटप करून त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला संघटनेतील संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.