देवळी (चाळीसगाव), 7 नोव्हेंबर : सर्वांचा विकास, गरजूंना प्राधान्याने लाभ हेच आमचे धोरण राहील, असा विश्वास शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख संयोजक छगन तुळशीदास जाधव यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना व्यक्त केला.
जळगाव जिल्ह्यातील विविध ग्रामपचायत निवडणुकीचा निकाल काल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील देवळी गावातील पोटनिवडणुकीचाही निकाल काल जाहीर झाला. यामध्ये वॉर्ड क्रमांक 1 साठी 5 नोव्हेंबरला पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत यासाठी शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार गायकवाड अरुण माणिक यांनी बाजी मारली आहे.
या निवडणुकीच्या निकालानंतर शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख संयोजक छगन तुळशीदास जाधव यांच्यासोबत सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या प्रतिनिधींनी संवाद साधला.
शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख संयोजक काय म्हणाले –
ग्रामपंचायत गावाच्या विकासाचा पाया असते. गावाच्या विकासासाठी चांगली, कर्तव्यदक्ष लोकं सत्तेत असावी लागतात. सत्तेतील माणसाने कपटी, खुनशी अन सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारा असू नये. गरजूंना प्राधान्याने लाभ आणि गावातील दुर्लक्षित भागाचा प्राधान्याने विकास हेच सुत्र सत्ता सोपानावर बसलेल्या माणसांचे असावे लागते.
शेतकरी विकास पॅनलच्या सरपंच पदाचे उमेदवार अरुण गायकवाड यांना भरघोस मतांनी लोकांनी निवडून दिले. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. गावाचा विकास करण्यासाठी सर्वांचा विकास, गरजूंना प्राधान्याने लाभ हेच आमचे धोरण राहील. विजयी गुलालासोबत जबाबदारीचे ओझे पण असते याची जाणीव नवनिर्वाचित सदस्य आणि येऊ घातलेल्या ग्रामपंचायत सभासदांना आहे. लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील, या आश्वासनाशी आम्ही कटिबध्द राहु, असेही ते म्हणाले.
तसेच लोकाभिमुख योजना राबवणे व सामाजिक बांधिलकी जपणे ही नवनिर्वाचित सदस्यांची जबाबदारी आम्ही पूर्ण करू. गट, तट, भेद, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गोरगरीब जनतेस शासनाच्या योजना पोहोचवण्याचे काम “सेवक” म्हणून आम्ही करणार आहोत. हा विजय एतिहासिक तर आहेच. मात्र, हा विजय सत्तेसाठीचा नाही तर सत्याचा आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख संयोजक छगन तुळशीदास जाधव यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना दिली.

वॉर्ड क्रमांक 1 च्या सदस्याचे निधन –
देवळी गावातील ग्रामपंचायतीमध्ये 11 सदस्य आहेत. यामध्ये वॉर्ड क्रमांक 1 चे ग्रामपंचायत सदस्य मोहन रणा भिल्ल यांचे निधन झाल्याने वॉर्ड क्रमांक 1 जागा रिक्त होती. त्यांच्या निधनानंतर आता याठिकाणी निवडणूक 5 नोव्हेंबरला निकाल झाली. यानंतर 6 नोव्हेंबरला काल मतमोजणी झाली. या काट्याच्या लढतीमध्ये शेतकरी विकास पॅनेलने प्रगती पॅनलचा पराभव केला.
पॅनेलचे नेतृत्त्व कुणाकडे –
शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्त्व हे छगन तुळशीदास पाटील हे करत आहेत. तर प्रगती पॅनेलचे नेतृत्त्व माजी सरपंच दिवगंत भगवान तुकाराम पाटील यांचे पुतणे अतुल अशोक पाटील हे करत आहेत. याआधी अतुल अशोक पाटील यांच्या पत्नी अर्चना अतुल पाटील या अडीच वर्ष सरपंच होत्या.