पाचोरा, 12 मार्च : पाचोरा तालुक्यातील शिंदाड विकासो सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सन २०२३ ते २०२७ बिनविरोध झाली. यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या विकासो संचालकाचा सत्कार पाचोरा तालुका शिवसेना नेत्या (उद्धव ठाकरे गट) वैशाली सूर्यवंशी आणि उपजिल्हाप्रमुख उध्दव मराठे यांनी केला. काल शनिवारी शिंदाड येथे हा सत्कारसोहळा पार पडला.
सामाजिक, राजकीय मतभेद दूर व्हावेत, तसेच विकास व्हावा, एकोपा आणि शांतता नांदावी याकरिता गावातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शकांनी एकत्र येऊन गावातील होतकरू आणि गाव विकासाची सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात आली. यावेळी विकास सहकारी सोसायटी शिंदाड कार्यालय येथे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून संचालकांचे अभिनंदन करण्यात आले.
पाचोऱ्यात वाटले गाजर, अर्थसंकल्पाचा अनोख्या पद्धतीने निषेध VIDEO
यावळी अॅड.अभय पाटील (मा.उपजिल्हाप्रमुख), प्रशांत जैन (सचिव), विकास बापु, आनंदा चौधरी, हरी अमृत चौधरी, अशोक पंडित लोधी, अरुण तांबे, भास्कर रामचंद्र पाटील, विजय सदाशिव पाटिल, सुरेश अर्जुन पाटील, शांताराम बळीराम पाटील, धोंडू संपत पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व बिनविरोध संचालकांची यादी पुढीलप्रमाणे –
- १).हिलाल रामदास पाटील (सर्वसाधारण)
- २).समाधान सिताराम पाटील (सर्वसाधारण)
- ३).नरेंद्र विक्रम पाटील (सर्वसाधारण)
- ४).प्रेमसिंग भुरा परदेशी(सर्वसाधारण)
- ५).अर्जुन नारायण पाटील (सर्वसाधारण)
- ६).भाऊसाहेब नारायण पाटील (सर्वसाधारण)
- ७).रमेश काशीराम पाटील (सर्वसाधारण)
- ८).दिलीप भाऊराव तांबे (सर्वसाधारण)
- ९).लताबाई धोंडु चौधरी (महिला राखीव)
- १०).सुरेखा श्रिकांत पाटील (महिला राखीव)
- ११).संजय बळीराम पाटील (इतर मागास वर्ग)
- १२).धनगर कृष्णा अर्जुन (वि.भ.ज)
- १३).दत्तात्रय रामदास पाटील (अनु.जाती-जमाती)