भडगाव, 12 नोव्हेंबर : भडगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आजपासून प्रचाराला सुरूवात झाली असून, शिवसेनेच्या प्रचाराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मागील काही वर्षांत राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव शहराच्या विकासासाठी विविध विकास कामे राबविण्यात आली आहेत आणि आगामी काळात भडगावचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलण्याचे काम सुरू राहील, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भडगावची जनता विकासाच्या पाठीशी असल्याने नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि नगरपरिषदेत शिवसेनेचाच झेंडा फडकेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. भडगावात आज नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सकाळी श्रीराम मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
नगरपरिषद निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असून अनेकांकडून तुमची दिशाभूल केली जाऊ शकते. मात्र, भडगावची जनता नगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या हाती देण्यासाठी खंबीरपणे पाठीशी राहील, असा मला विश्वास असल्याचेही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
View this post on Instagram
‘…त्यावेळी विजयापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही!’ –
प्रत्येक घराघरात आमचा शिवसैनिक अनेक वर्षांपासून काम करतोय. आजच्या प्रचार रॅलीत आमच्या पक्षातील माता-बघिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आणि प्रत्येक बघिनी आमच्या नगरपरिषेदच्या शिवसेनेच्या उमेदवार रेखाताई मालचे यांच्या एक पाऊल पुढे जाऊन मतदारांना आवाहन करताएत आणि त्यांचा आशिर्वाद ते मागताएत. खरंतर, ज्यावेळी कार्यकर्ता हा मीच खरा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक आहे, असे सांगून पुढे जातो, त्यावेळी विजयापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, याचे चित्र मला भडगाव शहरात प्रचारानिमित्त पाहायला मिळाल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
भडगावात शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ –
भडगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्रचाराची आजाद चौकातून सुरूवात झाली. शनी चौक, सय्यद वाळा, गंजीवाडा, जालाली वाडा, कोळीवाडा, काकासाठ चौक आदी भागातून प्रचार रॅली पार पडली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. तसेच स्थानिक नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले.
याप्रसंगी शिवसेनेचे सुधाकर पाटील, समाधान पाटील, भूरा आप्पा, लखीचंद पाटील, डॉ. जमील शेख, गणेश परदेशी, इमरान अली सैय्यद, अतुल पाटील, अतुल परदेशी, जहांगीर मालचे, सुनील देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






