ईसा तडवी, प्रतिनिधी
वडगाव कडे (पाचोरा), 26 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र व ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 25 फेब्रुवारी, रविवार रोजी एस. एस.एम. एम. महाविद्यालयातील प्रा. डॉ.माणिक पाटील यांनी उपस्थितांना ‘ऐसा राजा होणे नाही’ या विषयावर मार्गदर्शन केले.
छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणून आपले अस्तित्व आहे. परस्त्री मातेसमान असा राजा होता. 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारा राजा म्हणजेच शिवछत्रपती. अशा अनके विषयांवर माणिक पाटील यांनी असे मार्गदर्शन केले. जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भा.ज.पा आ.आघाडी तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले.
यावेळेस पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल, मा जि. प. सदस्य मधुभाऊ काटे, वृंदावन हॉस्पिटल संचालक डॉ. निळकंठ पाटील, पत्रकार गजानन लादे, भिकन भाऊ, चंद्रकांत माहोर, भालचंद्र परदेशी, पोलीस पाटील सुनील काटे, माजी सरपंच अतुल पाटील, तंटामुकती अध्यक्ष गजानन भाऊ ग्रामपंचायत सदस्य भगवान भाऊ, श्री. स्वामी समर्थ सेवेकरी व ग्रामस्थ तसेच तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : Crime News : पतीने पत्नीला जंगलात नेत केली हत्या अन् स्वतःलाही संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना