सुनील माळी, प्रतिनिधी
पारोळा, 1 मार्च : पारोळा बसस्थानकाच्या काँक्रीटीकरणासाठी 1 कोटी 50 लाख रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली होती. या कामाचे आतापर्यंत 50 टक्क्याहुन अधिक काम पुर्णत्वास आले आहे. दरम्यान, या कामाची आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी पाहणी केली.
यावेळी या बसस्थानक परिसरात आपला उदरनिर्वाह भागवणारे व्यावसायिक, रिक्षाचालक व प्रवाशांशी अमोल पाटील यांनी सुरू असलेल्या कामाबाबत विचारपुस केली. यावेळी उपस्थित व्यावसायिकांनी काम अत्यंत समाधानपुर्वक असल्याचे सांगितले.
यावेळी शहरप्रमुख अमृत चौधरी, संजय चौधरी, शहरप्रमुख आण्णा चौधरी, उपशहरप्रमुख राकेश भोसले, पंकज मराठे, अस्लम खाटीक, भावडु चौधरी, राकेश शिंदे, पिंटु चौधरी, भावडु जगताप यांचेसह व्यावसायिक, रिक्षाचालक व प्रवासी आदी उपस्थित होते.
हेही वाचा : मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा फटका