चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 2 मे : भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या शिवसेनेने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीवर आक्षेप घेतला. ठाकरे गटाने जाहिरातीत पॉर्नस्टारचा वापर केला असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर केला. यावरून त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, ठाकरे गटातील महिला नेत्यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला.
चित्रा वाघ यांनी काय म्हटलंय? –
चित्रा वाघ यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत म्हटल्याप्रमाणे, शिवसेना उबाठा पक्षाने महिला अत्याचारासंदर्भाने एक जाहिरात निवडणूक कॅम्पेनिंगचा भाग म्हणून प्रसिद्ध केली आहे. ही जाहिात महिला अत्याचारासंदर्भात प्रसिद्ध केली असून या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले आहे. तसेच त्यात तो महिलांचे शोषण करतो. मग, अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारेंनी दिले प्रत्युत्तर –
ठाकरेंच्या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर ट्विटरवरून पलटवार केला. सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे, “आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण 3000 हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवण्णा, किंवा मुलुंडच्या HD व्हिडिओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी चुपचीळी करून बसल्या. त्यांची काही चूक नाही, सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत,” अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला.
आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण 3000 हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवना, किंवा मुलुंडचे HDव्हिडिओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी चुपचीळी करून बसल्या.
त्यांची काही चूक नाही, सध्या त्या दिल्या भाकरीच्या & सांगितल्या चाकरीच्या आहेत.@ShivSenaUBT_— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 2, 2024
प्रियंक चुतर्वेदी यांची जोरदार टीका –
ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली. कर्नाटकातील सेक्स कॅन्डल प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी म्हटलंय की, जो पॉर्न उमेदवार तुम्ही उभा केला, ज्याने हजारो महिलांचे शोषण केले. घरात काम करणाऱ्या महिलांनाही ज्यांनी सोडले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही याबाबत का विचारत नाहीत. मोदी यांनी प्रज्वल रेवण्णाच्या बाबातीत का विधान केले नाही. 2500 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लीप समोर आले आहेत, जो भाजपासोबत येऊन ही लढाई लढत आहे आणि त्याच व्यक्तीकडून हे व्हिडिओ मिळाले असल्याचा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा : महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार उद्या जळगावात, ‘असे’ आहे नियोजन