मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बांग्लादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तेथील इस्कॉनचे मंदिरही जाळण्यात आल्याची बातमी समोर आली. त्यामुळे मग हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तरी सरकार गप्प आहे. निवडणुकीपुरतंच त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का?’ असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बांग्लादेशातील हिंदूंच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या बटेंगे ते कटेंगे या नाऱ्यावरुनही जोरदार टिका केली.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- सातत्याने हे हल्ले सुरू आहेत.
- बांग्लादेशात इस्कॉनचे मंदिर जाळले तरी आपण गप्प आहोत.
- हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तरी आपण गप्प आहोत.
- विश्वगुरू अत्याचार गप्प का पाहत बसले आहेत.
- जसे आपण एका फोनवर युक्रेनचे युद्ध थांबवले होते, तसेच बांग्लादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्याबद्दल आपण भूमिका घ्यावी. पाऊले उचलावीत.
- इथं नुसतं बटेंगे, कटेंगे, फटेंगे, वटेंगे असं करुन उपयोग नाही.
- जिथे काही नाही, तिथे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाही.
- जिथे अत्याचार होता आहेत, त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज
- पंतप्रधानांना आमच्या खासदारांनी भेटीची वेळ मागितली होती. पण त्यांना ती नाकारण्यात आली.
- त्यांना खूप व्याप आहेत. त्यांना खूप फिरायचे असते. जगभर फिरायचे असते. भाषणे द्यायची असतात.
- त्यांच्या नजरेमध्ये बांग्लादेशात होणारे हिंदूंवरील अत्याचार लक्षात आले नाहीत. जसे मणिपूरचे आले नाहीत.
- बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मंदिरे जाळले जात आहेत.
- केंद्र सरकारने त्यावर काय पाऊले उचलणार आहेत, हे स्पष्ट केले पाहिजे.
- बाकीच्या चर्चा बाजूला ठेवा आणि संसदेत यावर भूमिका काय आहे, काय पाऊल उचलणार आहोत, यावर बोलावे.
- यांना फक्त हिंदूंची मते पाहिजेत. हिंदूंना घाबरवायचे. त्यांची मते घ्यायची आणि आल्यावर त्यांची मंदिरा पाडायची. यांचं हिंदुत्त्व कुठे गेलं.
- बांग्लादेशात हिंदू सुरक्षित नाहीत. माझ्या राज्यात हिंदूंची मंदिरे पाडली जात आहेत. ज्या हिंदूंच्या मतांवर तुम्ही निवडून आलात, त्यांची मंदिरे वाचवण्यासाठी तुम्ही काय कराल, असा सवालही त्यांनी सरकारला केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून खान्देशपुत्राला मोठी जबाबदारी, कोण आहेत डॉ. रामेश्वर नाईक?