चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 3 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून करण पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, करण पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
काय म्हणाले करण पवार? –
करण पवार मुंबईत माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, राज्यात सगळीकडे स्वार्थाचे राजकारण सुरू असताना उन्मेष पाटील यांनी स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता खासदारकीसाठी उमेदवारी मिळणे सहज शक्य असतानाही मित्राला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी स्वतःचे राजकीय करिअर बहाल केले आहे. तसेच गद्दारीच्या आणि पाठीत खंजीर खुपसण्याच्या राजकारणात आम्ही दोघे मित्र वेगळे उदाहरण उभे करत आहोत असे मी अभिमानाने सांगतो.
करण पवार पुढे म्हणाले की, ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत, ललिता पाटील, कुलभूषण पाटील यांच्यासह जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्यासोबत आमची बैठक झाली आणि या बैठकीत सर्वांनी मला पाठिंबा दिला आणि म्हणून माझी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.
हेही वाचा : Breaking : जळगाव लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, करण पवार यांना उमेदवारी जाहीर, ‘असा’ आहे त्यांचा परिचय