मुंबई/एरंडोल : गेल्या काही कालावधीपासून उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, नेत्यांचा ओढा हा सत्ता पक्षाकडे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक जण हे ठाकरे गटाला राजीनामा देऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यातच आता जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक रुपेश माळी, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, उप-तालुकाप्रमुख युवासेना अनिल महाजन, शहरप्रमुख अजय महाजन तसेच त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
काल मुंबई येथे हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, एरंडोलचे आमदार अमोल पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील, माजी खासदार ऍड.सुरेश जाधव, परभणी जिल्हा पक्ष निरीक्षक सुभाष साळुंखे, शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेत पक्षफूट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणातील पदाधिकारी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यातच आता एरंडोल विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक रुपेशभाऊ माळी, युवासेना जिल्हा समन्वयक अतुलभाऊ महाजन, युवासेना उपतालुकाप्रमुख अनिलभाऊ महाजन, सामाजिक कार्यकर्ते राहुलभाऊ माळी, युवासेना शहर प्रमुख जयेश महाजन, युवासेना शहर संघटक नितीन महाजन, भरत महाजन, राजेश महाजन, आबा नेरकर, सचिन महाजन, हिलाल माळी, हेमंत महाजन, लालु भेलसेकर, सागर महाजन यांनी शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांनी त्यांचा सत्कार करत शिवसेनेत स्वागत केले. तसेच त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.