पाचोरा, प्रतिनिधी : आषाढी वारीनिमित्त दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. यावर्षी देखील वारकरी पंढरपूरकडे जायला निघाले आहेत. दरम्यान, आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून या संपूर्ण घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, पाचोऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी या घटनेचा निषध केला आहे.
प्रांताधिकाऱ्यांना निवेदन –
वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात वैशाली सुर्यवंशी यांनी पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल यांना निवेदन दिले. श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार अत्यंत संतापजनक आहे. वारकरी संप्रदाय तसेच वारकरी बांधवांना संरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. भागवत धर्माची पताका घेऊन चालणाऱ्या आणि अत्यंत भक्ती मार्गाने आचरण करणाऱ्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचा हा मोठा अपमान आहे, अशा भावना वैशाली सुर्यवंशी यांनी व्यक्त केल्या.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती –
याप्रसंगी शेतकरीसेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, तालुकाप्रमुख शरदपाटील, दादाभाऊ चौधरी (शिवसेना शहर समन्वयक), अरुण तांबे (मा.पं.समिती सभापति), कैलास मिस्तरी (शहर प्रमुख शिवसेना), युवासेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, युवासेना तालुका प्रमुख भुपेश सोमवंशी, युवासेना शहर प्रमुख हरीश देवरे, युवासेना शहर संघटक प्रशांत सोनार, गौरव पाटील, संदीप पाटील आनंदभाऊ संघवी, पपुदादा राजपूत, गफ्फारभाई, मिथुन वाघ, पपु जाधव, अभिषेक खंडेलवाल, विकास पाटील, संजय चौधरी, खंडू सोनवने, अतुल चौधरी, विलास पाटील आदी उपस्थित होते.