सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 24 एप्रिल : पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथे नाल्यातील पाण्यात बुडून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. मुंदाणे येथे आयोजित केलेल्या लग्न समारंभात धुळे जिल्ह्यातील कायखेडे येथील नातेवाईक मुंदाने येथे आले असताना त्यांचा सहा वर्षीय मुलगा खेळत खेळत नदीकड गेल्याने त्याचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली.
काय आहे संपू्र्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, कायखेडे तालुका जिल्हा धुळे येथील कार्तिक शांतीलाल मोरे (वय 6 वर्ष) हा त्याच्या आई-वडिलांसह मुंदाणे येथे लग्नासाठी आले होते. दरम्यान, दुपारी कार्तिक हा खेळत खेळत नागेश्वर रस्त्यावरील पुलावर काम चालू आहे त्या ठिकाणी कॉलम ओतण्यासाठी केलेल्या खड्ड्यात पडून बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
दरम्यान, पारोळा कुटीर रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता डॉ. जिनेन्द्र पाटील यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा : Video : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहनांच्या लागल्या रांगा, शेतकरी ‘वेटिंग’वर, पाहा व्हिडिओ