• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा सहावा हप्ता उद्यापासून बँक खात्यात जमा होणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 28, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
The sixth installment of 'Namo Shetkari Mahasamman Nidhi' will be deposited in the bank account from tomorrow

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'नमो शेतकरी महासन्मान निधी'चा सहावा हप्ता उद्यापासून बँक खात्यात जमा होणार

मुंबई : ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या सहाव्या हप्त्यांतर्गत उद्यापासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत 2169 रुपयांची कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती देत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहावा हप्ता निधी वितरण

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2000 रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी 6000 रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्यात सन 2023-24 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये पी.एम.किसान योजनेच्या प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 6 हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी 6 हजार रुपयांची भर घालत आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत 12 हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 26 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे. आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एकूण 5 हप्ते वितरीत करण्यात आलेले असून राज्यातील 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना 8961.31 कोटी रुपयांचा लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डिसेंबर, 2024 ते मार्च, 2025 या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 29 वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. या हप्ता वितरण सोहळयामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 92.89 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम 1967.12 कोटी निधीचा लाभ वितरीत करण्यात आलेला आहे. या व्यतिरीक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पी.एम. किसान योजनेअंतर्गत एकूण 65,047 लाभार्थीना लाभ अदायगीचे नियोजन केले आहे. त्यानुसार राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम 2169 कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: agriculturedevendra fadnavisfarmersmaharashtra farmersNamo Shetkari Mahasamman Nidhinarendra modiनमो शेतकरी महासन्मान निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page