• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विशेष मालिका : राजभवनाचे किस्से – लेख 2, कोण असतात राज्यपालांचे पट्टेवाले?, काय आहे त्यांचा इतिहास?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 23, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Special Series: Rajbhavanache Kisse - Article 2 , Who are the Pattewales of the Rajpal?, What is their history?

विशेष मालिका : राजभवनाचे किस्से - लेख 2, कोण असतात राज्यपालांचे पट्टेवाले?, काय आहे त्यांचा इतिहास?

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जाईल. या मालिकेतील हा दुसरा लेख.

राज्यपालांचे पट्टेवाले –

ते कार्यक्रम स्थळी सभागृहात आले की उपस्थितांना राज्यपाल महोदयांच्या आगमनाची वर्दी मिळते व लोक सावध होतात. हे आहेत राज्यपालांचे सेवादार शिपाई – त्यांना परंपरेने पोशाखात लाल कापडी पट्टा असल्याने – राज्यपालांचे पट्टेवाले असे म्हणतात.

ब्रिटिश राजवटीतील गव्हर्नर हे पद स्वातंत्र्यानंतर संपुष्टात आले नाही. त्याऐवजी लोकशाही व्यवस्थेतील राज्यपाल पद निर्माण करण्यात आले. गव्हर्नर पदाचा राजशिष्टाचार मात्र, राज्यपाल आल्यानंतर देखील कायम राहिला.

राजशिष्टाचाराचा एक मोठा फायदा असा की देशात राष्ट्रपतींचे व राज्यात राज्यपालांच्या कार्यक्रमाला एक शिस्तीचे कोंदण असते. दोन्ही मान्यवरांच्या कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन काटेकोरपणे केले जाते व त्यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करीत असते.

राज्यपालांचे एडीसी (Aide De Camp) – मराठीत ‘राज्यपालांचे परिसहाय्यक’ – हे राज्यपालांच्या राजशिष्टाचाराचे दृश्य प्रतीक आहे. राज्यपालांचे एडीसी हे सातत्याने राज्यपालांसोबत दिसतात. एडीसी हे आयपीएस अधिकारी असतात तसेच नेव्ही, आर्मी, एअरफोर्स मधील नवनियुक्त युवा अधिकारी असतात. राष्ट्रपती हे तर देशातील सैन्यदलांचे सर्वोच्च कमांडर असतात. त्यामुळे राष्ट्रपतींकडे मिलिटरी सचिवालय देखील असते. त्यात अनेक वरिष्ठ मिलिटरी अधिकारी व किमान ३ – ४ एडीसी असतात.

राज्यपालांच्या एडीसी यांच्या मार्गदर्शनाखाली वैशिष्ट्यपूर्ण पेहरावामुळे उठून दिसणारी एक राज्यपालांच्या शिपायांची ‘पट्टेवाल्यांची’ एक चमू असते. राज्यपालांच्या प्रत्येक कार्यक्रमात, बैठकीत व दौऱ्यात पट्टेवाले सोबत असतात. वरपांगी प्रतिष्ठेचे असलेले पट्टेवाल्यांचे कार्य मात्र कठीण व प्रसंगी परीक्षा घेणारे असते.

राज्यपालांच्या पट्टेवाल्यांकडे तत्परता, समयसूचकता, जागरूकता व सेवाभाव या गोष्टी असतात व सुरुवातीला नसल्या तरी त्या व्यवस्थेमध्ये विकसित होतात. राज्यपालांचे कार्यक्रम दोन तीन तास जरी चालले, तरीही पट्टेवाल्यांना बसणे अपेक्षित नसते. तितका वेळ जागरूक उपस्थित राहणे हा त्यांच्या कामकाजाचा भाग आहे. व्यासपीठावर उभे असलेल्या जागेपासून इतरत्र जावयाचे असल्यास दुसऱ्या पट्टेवाल्यास बोलावून तो आल्यानंतरच जागा सोडता येते. पट्टेवाल्यांना राज्यपाल महोदयांच्या आसपास, त्यांना दिसेल असे आणि इतक्या अंतरावर उभे राहावे लागते.

दौऱ्यांची लगबग –

राज्यपाल महोदयांच्या दौऱ्यासाठी पट्टेवाल्यांना जेथे दौरा आहे, तेथे किमान एक दिवस अगोदरच पोहोचावे लागते व त्यासाठी नियोजन करावे लागते. राज्यपालांचा दौरा गडचिरोली, नागपूर, अन्य जिल्ह्यात, दिल्ली, तामिळनाडू किंवा अन्यत्र असला तर पट्टेवाल्यांना राज्यपाल महोदय पोहोचण्यापूर्वी तेथे पोहोचावे लागते. तेथे जाऊन राज्यपाल महोदयांची बैठकीची जागा, तेथील आसनव्यवस्था, आदी अगोदरच जाऊन सुनिश्चित करावी लागते.

त्यामुळे सर्व पट्टेवाल्यांचे प्रमुख – त्यांना जमादार म्हणतात – यांच्या नेतृत्वाखाली दौऱ्यावर कोण जातील, निघतील केव्हा, परततील केव्हा, तेथूनच दुसरीकडे जावयाचे झाल्यास कसे जावे, इत्यादी नियोजन केले जाते. अर्थात हे सर्व नियोजन राज्यपालांच्या एडीसी यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. जमादारांप्रमाणे पट्टेवाल्यांमध्ये ‘चोपदार’ असतात आणि ‘हवालदार’ पण असतात.

बदलते पोषाख –

स्वातंत्र्य काळापासून पट्टेवाल्यांच्या पोशाखात देखील परिवर्तन झाले आहे. एक मोठा बदल राज्यपाल मोहम्मद फजल (२००२ – २००४) यांच्या कार्यकाळात झाला. पूर्वी पट्टेवाले डोक्यावर लाल रंगाची पगडी घालत. पगडी घालण्याची देखील एक पद्धत होती. फजल यांनी पगडी ऐवजी हवाई दलाच्या जवानांप्रमाणे टोपी घालण्याची प्रथा घालून दिली. वापरणाऱ्याकरिता ही नवी टोपी सोयीची झाली, हे खरे. परंतु, पगडीचा रुबाब काही और होता! ते असो. जमादार यांच्या कमरेला पूर्वी मोठा सुरा देखील असायचा. पुढे सुरक्षा कारणास्तव सुरा देखील बंद करण्यात आला.

स्वातंत्र्यानंतर राज्याला काही गांधीवादी राज्यपाल लाभले. विशेषतः राज्यपाल श्रीप्रकाश, पी सुब्बरायण, सादिक अली यांची राहणी, पेहराव अतिशय साधा असायचा. त्याकाळात टीव्ही चॅनेल्स नव्हते. त्यामुळे चेहरे लोकांचे परिचित नसत. त्यामुळे राज्यपाल एकटे कोठे गेले तर त्यांना कुणी ओळखले नसते. राज्यपालांच्या पट्टेवाल्यांचा पेहराव मात्र भारदस्त असायचा! त्यामुळे काही गमतीशीर प्रसंग देखील उद्भवत!

श्रीप्रकाश यांचा मोठेपणा –

राजभवनातून सेवानिवृत्त झालेले परिवार प्रबंधक जनार्दन संखे यांनी आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात या संदर्भात नोंदविलेली एक मजेशीर आठवण येथे नमूद करीत आहे. (पुस्तक: ‘आठवणीतील राजभवन’)

“(श्रीप्रकाश राज्यपाल असताना) असेच आम्ही औरंगाबादच्या दौऱ्यावर गेलो होतो. सोबत एडीसी, त्यांचे सेक्रेटरी, अटेंडंट, मी असा सर्व लवाजमा होता. औरंगाबाद स्टेशनवर आमची सलून (बोगी) लागली. औरंगाबादचे जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी राज्यपालांचं स्वागत करण्यासाठी स्टेशनवर आले होते. प्रोटोकॉलप्रमाणे डब्यातून प्रथम एडीसीने उतरायचं असतं आणि त्यांनी राज्यपालांना हात देऊन उतरवायचं असचं. नंतर एडीसीने राज्यपालांचं स्वागत करण्यासाठी आलेल्या कलेक्टर, एसपी आदी अधिकाऱ्यांची ओळख करून द्यायची असते हा रिवाज. पण त्या दिवशी काहीतरी गडबड झाली आणि अटेंडंट (पट्टेवाला) असलेला कल्याणसिंग डब्यातून पहिला उतरला. कल्याणसिंगचं व्यक्तित्वच एवढं रुबाबदार होतं की, राज्यपालांचं स्वागत करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी कल्याणसिंगलाच राज्यपाल समजून त्याचं स्वागत केलं, गळ्यात हार घातले. तोपर्यंत एडीसी शहाणेसाहेब आणि नंतर राज्यपाल श्रीप्रकाश उतरले. समोरचं दृश्य पाहून काय बोलायचं हे कुणालाच कळेना. काय गोंधळ झाला होता, तो श्रीप्रकाशजींच्या ध्यानात आला. श्रीप्रकाशजींनी न चिडता हा गोंधळ कशामुळे झाला ते समजून घेतलं.”

बिल क्लिंटन यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी फोटो काढले –

पट्टेवाल्यांचा पोशाख आजही रुबाबदार आहे. त्यामुळे अनेकदा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधान राजभवन येथे येतात त्यावेळी त्यांच्यासोबत आलेले अधिकारी, सुरक्षा अधिकारी राजभवनाच्या पट्टेवाल्यांसोबत अवश्य फोटो काढून जातात.

मुंबईत सन २००० साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आले होते व मुंबई येथून ते पाकिस्तानला प्रयाण करणार होते. प्रथेप्रमाणे राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर त्यांच्या स्वागत – निरोपासाठी मुंबई विमानतळावर गेले होते. त्याठिकाणी क्लिंटन यांच्या सुरक्षा टीमने राज्यपालांच्या पट्टेवाल्यांसोबत आवर्जून फोटो काढले होते, अशी आठवण राजभवन येथे ४१ वर्षे सेवा करून निवृत्त झालेले जमादार विलास मोरे यांनी सांगितली.

राजभवन येथे दिवंगत जगन्नाथ लोंढे हे अतिशय सेवाभावी जमादार होऊन गेले. त्यांनी नव्या पिढीला राज्यपालांची सेवा कशी तत्परतेने केली पाहिजे, हे शिकवलं. राज्यपालांच्या अभ्यागतांशी कसे अदबीने वागले – बोलले पाहिजे हे शिकविले असे विलास मोरे यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. पट्टेवाले आले आणि गेले. परंतु सेवेची परंपरा अखंड सुरु आहे!

पूर्वी राज्यपालांना आम्ही ‘जी हुजूर’ म्हणायचो आता ‘जी सर’ असे म्हणतात. हा काळानुरुप झालेला बदल त्यांनी निदर्शनास आणला. प्रसिद्ध छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे राज्यपालांच्या प्रजासत्ताक दिन चहापानाला आले असताना, त्यांनी सर्व पट्टेवाल्यांना एकत्र करून सोबतचे छायाचित्र काढले!

लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, राजभवन मुंबई)

बातमी शेअर करा !
Share
Tags: rajbhavanrajbhavan mumbairajbhavan mumbai newsrajbhavan newsrajbhavnache kissespecial series

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किस्से लोकभवनाचे – लेख क्र.- 15 |  किस्सा राज्यपालांच्या ‘कुर्सी’चा

किस्से लोकभवनाचे – लेख क्र.- 15 | किस्सा राज्यपालांच्या ‘कुर्सी’चा

January 24, 2026
उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 24, 2026
Jalgaon News : पंचायत समिती अमळनेर येथील बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

Jalgaon News : पंचायत समिती अमळनेर येथील बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

January 24, 2026
जळगावात निलेश सोनवणे यांना ‘तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक’ पुरस्कार प्रदान

जळगावात निलेश सोनवणे यांना ‘तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक’ पुरस्कार प्रदान

January 23, 2026
गोव्यासाठी १६ हजार ५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर

गोव्यासाठी १६ हजार ५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर

January 23, 2026
Big Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जिल्हा परिषदेच्या आणखी 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Big Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जिल्हा परिषदेच्या आणखी 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

January 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page