मुंबई, 19 जानेवारी : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कार्यालयांना अर्ध्या दिवसाची म्हणजे दुपारी अडीच वाजेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली असतानाच राज्य सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारद्वारे महाराष्ट्रातही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्याचसाठी राज्य सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी (सोमवार) रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सार्वजनिक सुट्टी जाहीर –
अयोध्येत 22 जानेवारी 2024 अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराम लल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली होती. दरम्यान, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश आल्याने महाराष्ट्र सरकारद्वारे 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा : Ram Mandir : 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर; केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी