मुंबई, 15 फेब्रुवारी : राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद’विरोधात राज्य सरकारने पाऊले उचलली असून पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. दरम्यान, ही समिती राज्यातील सध्याची परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसूदा तयार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लव्ह जिहाद कायदा लागू करण्याची होती मागणी –
महाराष्ट्रात लव्ह जिहाद व फसवणूक, बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू करण्याची मागणी भाजपाचे नेते आणि राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांच्यासह राज्यातील विविध हिंदू संघटनांनी केली होती. दरम्यान, राज्यातल्या धर्मांतराच्या तक्रारीनंतर या विरोधात कायदा करण्याची ग्वाही तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. महाराष्ट्र हे देशातील 10 वे राज्य ठरणार –
लव्ह जिहाद विरोधात कायदा बनविण्यासाठी आता विशेष समिती गठीत करण्यात आली असून लव्ह जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसूदा तयार करणार आहे. दरम्यान, लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील 10 वे राज्य ठरणार आहे. देशात आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तराखंड, ओडिसा तसेच छत्तीसगड या 9 राज्यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे.लव्ह जिहादविरोधात कायदा बनिवण्यासाठी समिती गठीत –
राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत महिला व बालकल्याण विभागाचे सचिव, अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, गृहविभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे (विधी) सचिव हे सदस्य असतील. ही समिती नेमकं काय करणार? –
- राज्यातल्या सध्याच्या लव्ह जिहाद संदर्भात सध्या परिस्थितीचा अभ्यास करणार.
- लव्ह जिहाद व फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवणार.
- ज्या राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू केलेलाय त्याठिकाणचा अभ्यास करणार.
- कायद्याचा मसूदा तयार करणे तसेच कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्याचे काम करणार.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत