• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

“राज्यातील खेळाडूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील”

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे जळगावात थाटात उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 12, 2023
in जळगाव शहर, Uncategorized, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
“राज्यातील खेळाडूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील”

जळगाव, 12 मार्च : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविणा-या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रक्कमेत दहा लाखावरून पन्नास लाख म्हणजेच पाचपट वाढ करण्यात आली. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांची विविध स्पर्धेतील कामगिरी अधिक चांगली होण्यासाठी त्यांना सर्व सोयीसुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे काल मोठ्या थाटात क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, महाराष्ट्र राज्य तसेच जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. स्पर्धेपूर्वी सायंकाळी जिल्हा क्रीडा संकूलापासून ढोल ताशांच्या गजरात खेळाडूंची फेटे बांधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच खेळाडूंची मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दूर्तफा गर्दी झाली होती.

यावेळी मंत्री गिरीष महाजन काय म्हणाले –

मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, खेळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी विविध जिल्ह्यात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी निर्माण व्हावी, ही यामागील भूमिका असून राज्यातील खेळाडूंना जगातील विविध देशांतील मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभावे, यासाठी विविध करार (mou) करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रक्कमेत 10 लाखांवरून 50 लाख म्हणजेच पाचपट वाढ करण्यात आली. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांची विविध स्पर्धेतील कामगिरी अधिक चांगली होण्यासाठी त्यांना सर्व सोयीसुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जळगावचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, धुळ्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, शाम कोगटा, नितीन बरडे, प्रदिप तळवेलकर, अशोक चौधरी, शैला पाटील, अंजली पाटील, गणपत पोळ, नारायण अप्पा खडके, राजेंद्र घुगे, आस्वाद पाटील, मंगल पांडे, सचिन भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्तविकात नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मान क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे जळगाव जिल्ह्यास मिळाला आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध 20 जिल्ह्यातील 16 पुरूष व 16 महिला संघ असे एकूण 32 संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत एकूण 19 लाख 72 हजाराची रोख बक्षीस देण्यात येणार असून या स्पर्धा 11 ते 14 मार्च, 2023 या कालावधीत सागरपार्क मैदान येथे सुरू राहतील.

या स्पर्धेतील सहभागी संघामध्ये कबड्डी प्रो लीग तसेच विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. प्रत्येक संघातील 12 खेळाडू, 1 क्रीडा मार्गदर्शक व 1 व्यवस्थापक असा एकूण 14 जणांचा समावेश राहील. या स्पर्धेत 384 कबड्डीपट्टू, 100 सरपंच, पंच व पदाधिकारी, अधिकारी तसेच 50 स्वयंसेवक व समिती सदस्य असे एकूण 550 जण सहभागी होत आहेत.

या स्पर्धेसाठी सागरपार्क मैदानावर चार कबड्डीचे मैदान तयार करण्यात आले आहे. या स्पर्धेत अंतिम विजेत्या संघाला 1 लाख 50 हजार रुपयांचे तर उपविजेत्या संघाला 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी व इतर संघानाही बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडू व इतर यांची भोजन, निवास, प्रवास खर्च देण्यात येणार असून 5 हजार प्रेक्षकांसाठी सागरपार्क मैदानावर प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे, असेही यांनी सांगितले.

कबड्डीप्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी –

स्पर्धेच्या आयोजनासाठी जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभत आहे. स्पर्धेची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करून करण्यात आली. त्यानंतर जळगाव पोलीस दलाच्या बॅन्ड पथकाच्या तालावर सर्व सहभागी संघाचे संचलन पार पडले. शाहिर विनोद ढगे यांच्या पथकाने महाराष्ट्र राज्यगीत सादर केले. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. स्पर्धा बघण्यासाठी कबड्डीप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajangirish mahajan jalgaonjalgaon newsstate level kabaddi compititionstate level kabaddi compitition jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

June 1, 2026
IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

June 1, 2026
सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page