नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काल ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या टीमने महाराष्ट्राचे माजी कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांच्याशी संवाद साधला. सुरेश खाडे हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये कामगार मंत्री होते. मात्र, यावेळी त्यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यामागचे कारण काय आहे, तसेच एक कामगार ते कामगार मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा राहिला, याबाबत त्यांनी माहिती दिली.