सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचा द्वितीय वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच पाचोरा शहरातील महालपुरे मंगल कार्यालय याठिकाणी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील तर तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निवृत्ती गायकवाड हे होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाला प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, पाचोरा नायब तहसिलदार विनोद कुमावत, भडगावचे नायब तहसिलदार रमेश देवकर, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हा परिषद सदस्य मधुकाटे, पाचोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्वीय सहायक मयुर येवले उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन करत आगामी वाटलाचीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.