ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव हरेश्वर (पाचोरा)- मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील सर्वात पहिले ‘दर्पण’ वृत्तपत्र 6 जानेवारी रोजी सुरू केले. यामुळे 6 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच पत्रकार दिनाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’चे पाचोरा तालुका प्रतिनिधी इसा तडवी यांना पुष्पगुच्छ आणि डायरी पेन देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच यावेळी पिंपळगाव हरेश्वर परिसरातील इतर पत्रकार बंधूंनाही सन्मानित करण्यात आले.
पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या हस्ते पिंपळगाव हरेश्वर परिसरातील पत्रकार बंधूंना पुष्पगुच्छ व डायरी पेन देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सुवर्ण खान्देश लाईव्हचे पाचोरा तालुका प्रतिनिधी ईसा तडवी यांच्यासह परिसरातील पत्रकार बांधवांना सन्मानित करण्यात आले.

सर्वप्रथम दीपप्रज्वलन केल्यावर मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पत्रकार हे समाजाच्या हितासाठी कार्य करत असतात. समाजासाठी वेळ देतात. एखाद्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचे काम करतात, असे प्रतिपादन पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी केले. दरम्यान, यावेळी पत्रकार बांधवांनीही आपले विचार व्यक्त केले.
या पत्रकार बांधवांची होती उपस्थिती –
या सत्कार सोहळ्याला किशोर लोहार, चंद्रकांत भौर, दिपक मुलमुले, सुनिल लोहार, बालचंद्र परदेशी, गजानन लाधे, रवी पांडे, सतीश गोपाळ, दिलीप जैन, दिलीप पाटील, हेमंत तिवारी, रोशन जैन आदी पत्रकार बांधव तसेच पोलीस स्टेशन कर्मचारी राहुल बेहरे, अमोल पाटील, अरुण राजपूत व इतर कर्मचारी उपस्थित होते. किशोर लोहार यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.