भडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित, टी. आर. पाटील विद्यालयात इयत्ता दहावी आणि बारावी शालांत परीक्षेत विद्यालयातून प्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन सोहळा नुकताच पार पडला. विद्यालयातर्फे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले.
इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल हा 100% आणि इयत्ता दहावीचा निकाल हा 97.22% लागला आहे. सदर प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. अभिजीत शिसोदे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. जे. पाटील, श्री. डी. एम. पाटील, श्री. जे. एच. पवार, श्री. मनोज भदाणे, श्रीमती पुनम पाटील, श्री. संदीप पाटील, श्री. निखिल पाटील, श्री. निलेश पाटील व उपस्थित कर्मचारी वृंद हे उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. प्रतापराव हरी पाटील, व्हा. चेअरमन डॉ. सौ. पुनमताई प्रशांत पाटील, सचिव श्री. प्रशांत विनायकराव पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक केले आहे, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.