मुंबई – जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.
कोण होते उस्ताद झाकीर हुसेन –
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला होता. झाकीर हुसेन हे संगीत जगतातील एक मोठे नाव होतं. झाकीर हुसेन हे जगातील महान तबलावादकांपैकी एक मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या या योगदानामुळेच 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच त्यांना 1999 मध्ये यूएस नॅशनल एन्डॉवमेंट फॉर द आर्ट्सने नॅशनल हेरिटेज फेलोशिप दिली. तेव्हा त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून ओळखले गेले. झाकीर हुसैन यांनी वयाच्या 7व्या वर्षी पहिला परफॉर्मन्स दिला होता. झाकीर हुसेन हे पहिले भारतीय आहेत. यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टसाठी आमंत्रित केले आहे.
त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह रक्खा कुरेशी आणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीर यांचे वडील अल्ला रक्खा हेही तबलावादक होते. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. झाकीर हुसेन यांना 4 ग्रॅमी पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यापैकी त्यांना तीन मिळून मिळाले आहेत.