• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चाळीसगाव

मोदी सरकारने घेतलेला जातीनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरणार, चाळीसगावात मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 24, 2025
in चाळीसगाव, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
The decision of the Modi government to conduct a caste-wise census will be revolutionary, asserts Minister Chhagan Bhujbal in Chalisgaon

मोदी सरकारने घेतलेला जातीनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरणार, चाळीसगावात मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

जळगाव, 24 ऑगस्ट : चाळीसगाव येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या शुभहस्ते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे वंचित समाजघटकांना न्याय मिळणार असून हा निर्णय क्रांतिकारी ठरेल. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य देशासाठी दीपस्तंभ आहे. या स्मारकामुळे एक प्रेरणादायी वास्तू समाजास लाभली असून तिच्या स्वच्छतेची जबाबदारी सर्वांची असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, योग्य नेतृत्व, ठाम भूमिका व सकारात्मक शासन असेल तर अशक्य काहीही नाही. स्मारक म्हणजे केवळ इतिहासाचा सन्मान नसून पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचे शिलालेख आहे. तरुणांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहून महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी स्मारकासाठी एक कोटी ऐवजी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती, ज्याचा पाठपुरावा आमदार मंगेश चव्हाण यांनी करून अवघ्या ४८ तासांत शासन निर्णय काढण्यात यश मिळवले, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार स्मिताताई वाघ, विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार साहेबराव घोडे, महात्मा फुले स्मारक समितीचे सदस्य, मोठ्या संख्येने चाळीसगावमधील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. पुण्याचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी स्मारकाच्या उभारणीबाबत समाधान व्यक्त करून चाळीसगावच्या समाजबांधवांची ही अभिमानास्पद कामगिरी असल्याचे सांगितले.

आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या मनोगतात स्मारक उभारणीचा घटनाक्रम सांगितला. जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजात प्रेरणेची फुले उधळण्याचे काम या स्मारकातून झाले आहे, असे ते म्हणाले. तसेच आपल्या हिंगोणे गावातील जिल्हा परिषद शाळा क्लस्टर मॉडेल स्कूल स्वरूपात उभारून तिला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची घोषणा त्यांनी केली. प्रास्ताविक दिनेश महाजन यांनी केले. यावेळी उद्धवराव महाजन, डॉ. संजय माळी, सचिन महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: chalisgaonchalisgaon newschhagan bhujbalgirish mahajanmangesh chavan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: एनसीएमसी कार्डसाठी पाचोरा आगाराची विशेष मोहीम; तीन गावांत शिबिरांचे आयोजन

Pachora News: एनसीएमसी कार्डसाठी पाचोरा आगाराची विशेष मोहीम; तीन गावांत शिबिरांचे आयोजन

November 28, 2026
“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

November 27, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

November 27, 2026
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

November 26, 2026
पाचोरा नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर; नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्याकडून एक महिन्यासाठी प्रभारी जबाबदारी

पाचोरा नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर; नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्याकडून एक महिन्यासाठी प्रभारी जबाबदारी

November 26, 2026
जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; शासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर बातमी

जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; शासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर बातमी

November 26, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page