मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या हफ्त्यांची लाभार्थी महिलांकडून प्रतिक्षा केली जात आहे. अशातच मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचे 3000 हजार रूपये हे एका टप्प्यात नव्हे तर दोन टप्प्यात जमा केले जाणार आहेत. याबाबत मंत्री अदिती तटकरेंनी महत्त्वाची माहिती दिली.
काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. तसेच ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे दोन टप्प्यात एकूण 3 हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे, असे आवाहनही मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांच्या पडताळणीला सुरूवात झाली. यामधून जवळपास 9 लाख महिला योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. दरम्यान, लाडकी बहिण योजनेतून अपात्र करण्याचा आकडा वाढत जात असल्याने फेब्रुवारी महिन्याची रक्कम खात्यात जमा न झाल्यामुळे लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार किंवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. यातच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी महिला दिनाच्या औचित्यावर हे पैसे जमा होणार असल्याची माहिती दिली होती. यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचे 3000 रूपये आज 7 मार्चपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याचे मंत्री अदिती तटकरें सांगितले होते. मात्र, त्यामध्ये महिलांना फक्त फेब्रुवारीचे आल्यानंतर मार्च महिन्याचे कधी येणार याबाबतही संभ्रम निर्माण झाला. याबाबत आता मंत्री अदिती तटकरेंनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. तसेच ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे दोन टप्प्यात एकूण 3 हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
हेही वाचा – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली महत्त्वाची माहिती