मुंबई – राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आणि या गोळाबाराच्या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शरद पवार यांनी ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले शरद पवार –
आपल्या ट्विटमध्ये शरद पवार यांनी म्हटले की, राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 12, 2024
कशी घडली घटना –
बाबा सिद्धिकी 9.15 मिनिटांच्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडले होते. यादरम्यान, ते कार्यालयाजवळ फटाके वाजवत असताना गोळीबार झाला. फटाके फोडत असताना अचानक 3 जण गाडीतून उतरले. तोंडावर रुमाल बांधून हे तीन जण आले होते. त्यानंतर त्यांनी बाबा सिद्धिकी यांच्यावर 3 राऊंड फायर केले. बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. त्यांना छातीत एक गोळी लागल्यानंतर ते खाली कोसळले. त्यानंतर लोकांनी त्यांना लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल केले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी झाले दाखल असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा : Big Breaking : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या, मुंबईत नेमकं काय घडलं?