एरंडोल (जळगाव), 21 ऑगस्ट : श्रावण महिन्यातील उत्सवाला सुरूवात होत असतानाच धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रामेश्वर येथील महादेव मंदिरात कावड घेवून दर्शनासाठी गेलेले तीन तरुण भाविक गिरणा तापी त्रिवेणी संगमावर बुडाल्याची घटना घडली आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या गिरणा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी श्रावण महिन्यात मोठी गर्दी असते. दरम्यान, रामेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवार निमित्त कावड घेवून दर्शनासाठी गेलेले तीन तरुण भाविक गिरणा तापी नदीच्या संगमावर बुडाले असून दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. सागर शिंपी,अक्षय शिंपी व पियुष शिंपी अशी तीन बुडालेल्या नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व एसडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बुडालेल्या तीन तरुणांचा शोध सुरू आहे. तिन्ही तरुण हे एरंडोल शहरातील रहिवासी असून एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.