मिलिंद वाणी, प्रतिनिधी
अमळनेर, 7 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ आज 7 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास दोन दुचाकी आणि ओमीनी कार यामध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत. तीनही मृत तरुण चोपडा येथील असल्याचे समजते.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील सहा जण मंगरूळ येथे केटरर्सचे काम करण्यासाठी आले होते. ते ट्रिपलशीट मोटरसायकल क्रमांक एम. एच. 19 डी. एल. 8693 व आणखी एका मोटरसायकलवर ट्रीपलसीट चोपडयाकडे निघाले होते. दरम्यान, चोपड्याकडून ओमनी क्रमांक एम. एच. 19 वाय 1828 येत होती. या ओमनीत 12 जण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कृपया, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
युट्यूब चॅनल लिंक – https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
चोपड्यातील तिघांचा जागीच मृत्यू –
मात्र, दोन्ही मोटारसायकल ओमनीवर आदळल्याने ओमनी चालकाचे पाय स्टेअरिंग मध्ये अडकले होते. तर दोन्ही मोटारसायकली रस्त्याच्या आजूबाजूला पडल्या आणि त्यात दोघे जण जागीच ठार झाले. तर एक ग्रामीण रुग्णालयात मयत झाला. शुभम पारधी (वय 21, रा. सुंदरगढी, चोपडा), विजय बाळू पाटील (वय 28, गुजरअळी, चोपडा) व केवाराम पावरा (वय 25, आदिवासी वसतिगृह, चोपडा) अशा तिघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ओमनी चालक विजय महाजन याला धुळे येथे रवाना करण्यात आले. आहे तर इतर जखमींवर खाजगी रुग्णालायात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : crime news : भररत्यावर माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या, सांगलीतील हादरवणारी घटना