जळगाव, 23 जून : राज्यात विविध ठिकाणी चार ते पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पावासाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये कोकण, मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पाऊस पडला. दरम्यान, मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत असल्याने हवामान विभागाने राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
राज्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर विविध भागात काल पावसाने हजेरी लावली. कोकणासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील काही भागात आतापर्यंत समाधान कारक पाऊस झाल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. दरम्यान, आज हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना आशा लागलीय.
हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट –
पावसाच्या बाबतीत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी असे तीन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत तीन दिवस अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
जळगाव जिल्ह्यात काय आहे पावसाचा अंदाज? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपुर्वी जोरदार पाऊस झाला होता. मात्र, यानंतर समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा : कोकण, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस, जळगाव जिल्ह्याचा नेमका काय आहे अंदाज?