सुनील माळी/संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 12 एप्रिल : पारोळा शहरातील विविध ठिकाणी समाजसुधारक महात्मा फुले यांची197 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
माळी समाज महासंघाच्यावतीने जयंती साजरी –
पारोळा शहरात माळी समाज महासंघाच्यावतीने महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तसेच महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे, सुरेश दयाराम महाजन, कैलास महाजन, संजय महाजन, विलास महाजन व सर्व समाज बांधव उत्सव समिती सदस्य, नवयुवक मंडळ व समाज बांधव उपस्थित होते.
अमोल पाटील यांनी केले अभिवादन –
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त पारोळा येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी क्रांतिसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील, बांधकाम व्यावसायिक पी.आर.वाणी, संजय महाजन, धिरज महाजन, कैलास महाजन, ज्ञानेश्वर महाजन, लखन महाजन, सागर महाजन, विशाल देवरे, सलिम पटवे, पंकज मराठे, भावडु चौधरी, विशाल महाजन, खुशाल महाजन यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सतीश पाटील यांच्यावतीने अभिवादन –
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक रोहन मोरे, माजी नगरसेवक नितीन सोनार, युवा व्याख्याते धिरज चव्हाण, उत्सव समिती सदस्य, नवयुवक मंडळ व समाज बांधव उपस्थित होते.