मुंबई, 1 जानेवारी : केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरात तीव्र विरोध होत असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी ट्रकचालकांनी बंद पुकारला असून नवी मुंबईमध्ये ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. आंदोलकांनी चक्क पोलिसांवरच हल्ला चढवला आहे. जमावाने पोलिसावर लाठ्या काठ्याने हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
काय आहे हा नवीन कायदा? –
केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यापूर्वी, आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे. दरम्यान, या कायद्याविरोधात देशभरातील ट्रक ड्रायव्हर्स आणि बस ड्रायव्हर्सकडून याचा निषेध व्यक्त होत आहे.
ट्रक चालक संपावर –
केंद्र सरकारच्या नवीन मोटार कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देश भारतील सर्वच ट्रक चालक संपावर गेले आहेत आहे. आजपासून तीन दिवसांचा संप असून त्याचाच परिणाम म्हणून ट्रक चालक रस्त्यावर उतरले असून रस्ता रोको केला आहे. तर ऑटोचालकांनीही नव्या कायद्याविरोधात मोर्चा उभारला आहे.
ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण –
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईजवळच्या महामार्गावरचा हा समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका पोलिसाला आंदोलकांनी घेरले आहे. मारो…मारो पोलीसवाले को मारो, असे या व्हिडीओमध्ये जमाव म्हणत असून लाठ्या काठ्या घेऊन पोलिसाच्या अंगावर धावून गेले आहे. संतप्त जमावाला पाहून पोलीस कर्मचाऱ्याने आपला जीव वाचवण्यासाठी संबंधित स्थळावरून पळ काढला आहे.