जळगाव, 9 मार्च : जळगाव जिल्ह्यात लाचखोरींच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. रायपूर ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सदस्याला 3 अपत्यबाबत दाखल तक्रारी संदर्भात चांगला अहवाल सादर करण्यासाठीच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांची मागतल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य हे ग्रामपंचायत निवडणूक 2021 मध्ये निवडून आले होते. यानंतर तक्रारदार सदस्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात रायपूर गावातील एकाने 3 अपत्याबाबत तक्रार अर्ज केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात सदर प्रकरण प्रलंबित होते.
लिपिकांनी मागितली लाच –
दरम्यान, ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले महेश रमेशराव वानखेडे (वय-30, रा. नेर) आणि समाधान लोटन पवार (वय-35, रा. पारोळा) या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबतचा चांगला अहवाल तयार करून देतो, त्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाही, यासाठी 30 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी शनिवारी 9 मार्च रोजी लाचलुचपत विभागात तक्रार दिली.
एसीबीने पकडले रंगेहाथ –
लाचलुचपत विभागाने याप्रकरणात सापळा रचत संशियतांना 20 हजार रूपायांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी आरोपींविरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकाची कारवाई –
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक फौजदार, पो.ह.रविंद्र घुगे, सुरेश पाटील, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोलीस नाईक बाळू मराठे, पोकॉ अमोल सुर्यवंशी, अमोल वालझाडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर, प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने, प्रदीप पोळ यांनी सापळा रचत ही कारवाई केली.
हेही वाचा : पारोळा येथे पाच वाहनांवर पोलिसांची कारवाई, सव्वा लाखांचा बसला दंड, काय आहे संपूर्ण बातमी?