• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दोघींचे अभिनंदन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 23, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड

मुंबई, 23 एप्रिल: नाशिक येथील मुलींच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेने उल्लेखनीय यश मिळवले असून या केंद्रातून राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) साठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही विद्यार्थिनींनी देशपातळीवर मुलींमध्ये अनुक्रमे दुसरा आणि पंधरावा क्रमांक मिळवला आहे. देशभरातून केवळ १९ मुलींची एनडीएसाठी निवड होत असताना नाशिकच्या या केंद्राने मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद मानले जात आहे.

निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये कुमारी जिया सचिन करपे हिने मुलींमध्ये अखिल भारतीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळवला आहे, तर कुमारी समृद्धी प्रविण इंगळे हिने १५ वा क्रमांक पटकावला आहे. दोन्ही विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून नाशिक येथे १८ जून २०२३ रोजी मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था सुरू करण्यात आली. राज्यातील मुलींना संरक्षण दलात अधिकारी म्हणून संधी मिळावी, या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या संस्थेत इयत्ता ११वी व १२वीच्या विद्यार्थिनींना दोन वर्षांचा विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम दिला जातो. या संस्थेची स्थापना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण विभाग असताना करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे मुलींसाठी एनडीए भरतीपूर्व प्रशिक्षण देणारे हे देशातील पहिलेच केंद्र आहे.

यापूर्वीही या संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली असून मागील वर्षी हंसिका टिल्लू हिची एनडीए साठी निवड झाली होती. यंदा दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड झाल्यामुळे या संस्थेच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. दरम्यान, नाशिकमधील हे केंद्र भविष्यात अधिकाधिक विद्यार्थिनींना सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी प्रेरित करेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: ‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: nashik newsndapre-military training centrepre-military training centre nashiksuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड

नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड

April 23, 2026
वाहतूक कोंडीनं काल महिला संतापली अन् मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “पुढील काळात अशा प्रकारची……..”

वाहतूक कोंडीनं काल महिला संतापली अन् मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “पुढील काळात अशा प्रकारची……..”

April 22, 2026
‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 22, 2026
महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची बालविवाह रोखण्यात राज्यव्यापी धडक कारवाई

महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची बालविवाह रोखण्यात राज्यव्यापी धडक कारवाई

April 22, 2026
VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

April 22, 2026
VIDEO | श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून स्वीकारला पदभार

VIDEO | श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून स्वीकारला पदभार

April 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page