• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

हृदयद्रावक!, दुचाकी आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक, लासगाव येथील 2 सख्ख्या भावांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा

पुण्यातील आळेफाटा परिसरात झाला हा भीषण अपघात, मृत सख्ख्या भावांवर लासगाव या मूळगाव होणार अंत्यसंस्कार

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
October 6, 2024
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Lasgaon accident

दुचाकी आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक, लासगाव येथील 2 सख्ख्या भावांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पुणे/जळगाव – जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकी आणि पिकअप वाहन यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. विजय आधार भालेराव (वय-26), अशोक आधार भालेराव (वय-21) अशी या दोन्ही सख्ख्या मृत भावांची नावे आहेत. मृत तरुण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लासगाव गावातील रहिवासी आहेत.

काय आहे संपूर्ण घटना –
अपघाताची ही दुर्देवी घटना पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार (PSI Anil Pawar) यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना या अपघाताबाबत संपूर्ण माहिती दिली.

सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना त्यांनी सांगितले की, काल शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दोन्ही भाऊ पुण्यावरुन जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या लासगाव या आपल्या मूळगावी येत होते. या दरम्यान, संतवाडी याठिकाणी गुरूदेव हॉटेलजवळील पुलावर त्यांची दुचाकी आणि समोरुन येणाऱ्या एका पिकअप वाहनाच्या दरम्यान समोरासमोर जोरदार टक्कर होऊन हा भीषण अपघात झाला. हे पिकअप वाहन मेंढपाळ यांचे होते. त्यांच्या पिकअप वाहनात भुसा भरला होता.

यावेळी दोन्ही वाहने समोरासमोर धडकले आणि हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

गावकऱ्यांनी दिला मदतीचा हात, उद्या होणार अंत्यसंस्कार –
मृतांच्या कुटुंबीयांची परिस्थिती ही हालाखाची असल्याने या तरुणांच्या अंत्यविधीसाठी गावकऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे, तसेच समस्त गावकऱ्यांच्या वतीने पैसे जमा केले जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय भालेराव आणि अशोक भालेराव या दोन्ही भावांवर उद्या सोमवारी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, लासगाव गावातील दोन सख्ख्या भावांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज युट्यूब चॅनल लिंक –
https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos

बातमी शेअर करा !
Share
Tags: alephata police stationlasgaon accident newslasgaon newsmajor accident punepachora accident news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

May 14, 2026
उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page