यावल, 17 एप्रिल : काही दिवसांपूर्वीच यावल तालुक्यातील डांभुर्णी जवळ असलेल्या किनगावनजीक एक बालक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, आज पुन्हा एकदा दोन वर्षीय बालिका बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना उघडकीस आलीय आहे. यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात मेंढपाळ कुटुंबातील दोन वर्षीय बालिकेवर बिबट्याने झडप घालत तिला ठार केल्याची घटना खळबळजनक घटना आज 17 एप्रिल रोजी उघडकीस आली. रत्नाबाई सतीश रुपनर (2) असे मयत बालकिचे नाव आहे.
नेमकी घटना काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र. 741 मध्ये मेंढपाळांचे तीन कुटुंब हे गेल्या पाच दिवसापासून वास्तवाला आहेत. दरम्यान, काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने या कुटुंबातील रत्नाबाई ही दोन वर्षाच्या चिमुकली आपली आई जिजाबाई रूपनर हिच्यासोबत झोपलेली असतांना तिच्यावर झडप घातली आणि तिला उचलून केळीच्या बागेत पसार झाला.
दरम्यान, कुटुंबियांनी त्या बालिकेचा शोध घेतला असता थोड्या अंतरावर तिच्या शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यानंतर वनविभागातील कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी वन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केलाय. दरम्यान, बिबट्याचा वाढता वावर आणि त्याच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकरी संतप्त झाले असून वन खात्याने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी आता होत आहे.
हेही वाचा : शिवजयंतीचा मुद्दा, मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना सवाल; म्हणाले, “तुम्ही मुख्यमंत्री असताना……”