धाराशीव, 25 सप्टेंबर : राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यंमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तर आज दुसरीकडे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा करत शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
उद्धव ठाकरेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी –
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी लातूर तसेच धाराशीवमध्ये नुकसानग्रस्त भागाची करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. तसेच आम्हाला सरकारकडून मदत पाहिजे, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी –
पावसात फक्त शेतीच नव्हे तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेलंय. दरवेळेला योग्य वेळेला मदत करू असे सरकारकडून सांगितले जातं. मात्र, आता योग्य वेळ कधी येणार आणि ही योग्य वेळ येण्यासाठी पंचांग पाहणार आहात का? असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला. तसेच आम्ही एक प्रयत्न केला होता. तसाच प्रयत्न आता करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी महत्त्वाची मागणी ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन महत्वाच्या मागण्या –
- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
- शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट 50 हजार रूपयांची मदत जाहीर करा.
- पीकविम्याची रक्कम सरकारने तत्काळ द्यावी.</li>