• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Jalgaon News : ‘पालकमंत्री क्रीडांगण विकास योजने’तून 167 जिल्हा परिषद शाळांना 12 कोटींचा निधी मंजूर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 22, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Jalgaon News : ‘पालकमंत्री क्रीडांगण विकास योजने’तून 167 जिल्हा परिषद शाळांना 12 कोटींचा निधी मंजूर

जळगाव, 22 जानेवारी : जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे तसेच खेळासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘पालकमंत्री क्रीडांगण विकास योजना’ राबविण्यात येत असून, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एकूण 167 जिल्हा परिषद शाळांसाठी 12 कोटी 14 लाख 40 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या शारीरिक – मानसिक विकासाला मिळणार चालना –

ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये क्रीडासुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा खेळाकडे ओढा कमी होत होता. परिणामी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक उत्साह व स्पर्धात्मक वृत्ती यावर परिणाम होत होता. आता या योजनेमुळे विद्यार्थ्यांना नियमित खेळाची संधी मिळून त्यांचा शारीरिक – मानसिक विकास होण्यास चालना मिळणार असून शाळांमध्ये उपस्थिती व पटसंख्या वाढण्यासही मोठी मदत होणार आहे.

यापूर्वी, जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री वॉल कंपाऊंड योजना यशस्वीपणे राबविण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता शाळांमधील क्रीडासुविधा वाढवण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 99 शाळांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर 67 शाळांना प्रत्येकी 3 लाख 20 हजार रुपये याप्रमाणे निधी वितरीत करण्यात आला आहे.

शाळेतील उपलब्ध जागा, पटसंख्या व आवश्यक कामाचा विचार करून ही आर्थिक तरतूद निश्चित करण्यात आली असून, या शाळांमध्ये क्रीडांगण व पटांगणाचे सपाटीकरण करून कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलसह 200 मीटर रनिंग ट्रॅक व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या शाळांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे तसेच ज्या शाळांची पटसंख्या तुलनेने जास्त आहे, अशा शाळांची निवड शिक्षण विभागाने केली आहे.

तालुकानिहाय मंजूर शाळांची संख्या अशी –

अमळनेर – 13, भडगाव – 7, पाचोरा – 14, भुसावळ – 7, पारोळा – 10, मुक्ताईनगर – 10, रावेर – 13, बोदवड – 4, यावल – 10, चाळीसगाव – 17, एरंडोल – 8, चोपडा – 10, धरणगाव – 11, जामनेर – 21, जळगाव – 11

“शाळांमधील शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होणे तितकेच महत्त्वाचे आहे. क्रीडांगण उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होईल, शाळांमध्ये उपस्थिती वाढेल आणि पटसंख्येलाही चालना मिळेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुलांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार, आमदार यांचे सहकार्य लाभले असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविला जाणार आहे.

– गुलाबराव पाटील, पालकमंत्री

 

“पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजनेतून शाळा विकासासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ‘पालकमंत्री क्रीडांगण विकास’ योजनेमुळे शाळांचे सर्वांगीण वातावरण सुधारेल. संबंधित यंत्रणांनी कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत, यासाठी प्रशासनामार्फत नियमित आढावा घेतला जाणार आहे.”

  • रोहन घुगे, जिल्हाधिकारी

 

“167 शाळांसाठी 12.14 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तांत्रिक मंजुरी व कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ही योजना निश्चितच दिशा देणारी ठरणार आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार क्रीडा सुविधा मिळाव्यात यासाठी गुणवत्तेवर विशेष भर दिला जाणार आहे.”

– मिनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी

हेही वाचा : video | मोठी बातमी! चाळीसगावात उभारला जाणार जागतिक दर्जाचा महाप्रकल्प; दावोसमध्ये 15 हजार कोटी रुपयांच्या SAF प्रकल्पासाठी सामंजस्य करार

बातमी शेअर करा !
Share
Tags: guardian minister playground development schemejalgaon district newsmarathi newssuvarna khandesh livezp schools

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

March 10, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

March 10, 2026
विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास महाविद्यालयावर कारवाई करणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती

विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास महाविद्यालयावर कारवाई करणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती

March 10, 2026
वरखेडी येथे महिला दिनानिमित्त नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

वरखेडी येथे महिला दिनानिमित्त नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

March 10, 2026
बारामती कॅटल फीड्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना टिफीन व टिफीन बॅगचे मोफत वाटप

बारामती कॅटल फीड्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना टिफीन व टिफीन बॅगचे मोफत वाटप

March 9, 2026
पाचोरा-भडगावसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा

पाचोरा-भडगावसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा

March 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page