• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home मुक्ताईनगर

minister raksha khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मुली आणि महिलांना केले महत्त्वाचे आवाहन, काय म्हणाल्या?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 3, 2025
in मुक्ताईनगर, ताज्या बातम्या
Union Minister Raksha Khadse made an important appeal to girls and women, what did she say

minister raksha khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मुली आणि महिलांना केले महत्त्वाचे आवाहन, काय म्हणाल्या?

मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. ही घटना समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी मंत्री रक्षा खडसेंनी काल मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेत टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केली. तसेच यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महिला व मुलींना महत्त्वाचे आवाहन केले.

माध्यमांशी बोलताना मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, मला हाच प्रश्न पडला आहे की, जर पोलीस आमच्या सुरक्षेसाठी दिलेले असतात आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्या गार्डला पाठवलेले आहे, तर कुणाची हिम्मतच नको व्हायला की, ड्रेसमध्ये असताना कुणी पोलिसांवर दादागिरी करू शकतो.

या सर्व गोष्टी अति वाढत आहेत. याला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे. याला पाठबळ कोण देतंय मला माहिती नाही. पण आज मी तुम्हाला सांगते की, जो काही प्रकार झाला, मलाही असं वाटतं की कुठे ना कुठे तरी मीसुद्धा कमी पडले. मीपण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होतं. पण इथून पुढे मी तुम्हाला सांगते की, या सर्व गोष्टींवर आम्ही पण बारकाईने नजर ठेऊन.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचे मुली आणि महिलांना आवाहन –

आज माझ्यासोबत झालं म्हणून मला माहिती पडलं. पण असे कितीतरी महिलांसोबत, मुलींसोबत असे प्रकार घडत असतील आणि आज मी तुमच्या माध्यमातून मुलींना आणि महिलांना आवाहन करते की, आपणही बऱ्याचवेळा की उगाच नाव पेपरमध्ये येईल, मुलीचं नाव पुढे येईल, कुटुंबाचं नाव पुढे येईल म्हणून आपण शांत बसतो. पण त्याचा कुठेही विचार न करता आपल्या मुलीसाठी, घरातील महिलेसाठी कुटुंबातील व्यक्तींनी पुढे आले पाहिजे आणि लहानातल्या लहान घडना जरी असतील तर त्या पोलिसांच्या कानावर घातल्या पाहिजे.

एकदा माझ्याही मनात हा विचार आला. मी जर बोलली नाही तर उद्या या मुक्ताईनगरमध्ये किंवा माझ्या मुलीसोबतही काही घडू शकते. मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेन की, कायदे भरपूर आहेत. पण या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबडतोब यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करायला हवी आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे. न्यायालयाच्या माध्यमातूनही अशा आरोपींना जामीन मिळू नये, अशा पद्धतीने यावर कार्यवाही व्हायला हवी.

तसेच आरोपी कुणाच्या जवळचा आहे, ही माहिती घेतली नाही आणि मी असं म्हणते की, तो माझ्याजरी जवळचा असेल किंवा कुणाच्याही जवळचा असेल पण शेवटी मुलींचा आणि महिलांचा याठिकाणी विषय आहे. तो माझ्याजरी जवळचा असेल किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या जवळचा असेल तर याचा विचार न करता, ज्याने गुन्हा केलेला आहे, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी मंत्री रक्षा खडसे यांनी केली.

हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..

हेही वाचा – मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : ‘या सर्व गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधींचं संरक्षण मिळतंय’, नाव न घेता एकनाथ खडसेंचा आमदार चंद्रकांत पाटलांवर आरोप

हेही वाचा – मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : आमदार चंद्रकात पाटलांनी दाखवले आरोपी अन् खडसे कुटुंबीयांचे फोटो; म्हणाले, तो आधी भाजपमध्ये…

बातमी शेअर करा !
Share
Tags: minister raksha khadsemuktainagarmuktainagar crimemuktainagar policemuktainagar police stationraksha khadseraksha khadse audio clipraksha khadse newswomen security

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Health check-up of citizens across the state through the 'Shri Ganesha Arogyacha' initiative, an initiative of the Chief Minister's Medical Assistance Fund Cell

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

August 29, 2025
CCI starts registration process for cotton purchase through Cotton Kisan app on mobile, Chairman Ganesh Patil makes an important appeal to farmers

सीसीआय खरेदी केंद्रावर कापुस विक्रीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी, सभापती गणेश पाटील यांचे आवाहन

August 29, 2025
India and Electrical Energy: Moving towards Self-Reliance special article

विशेष लेख : भारत आणि विद्युत ऊर्जा – आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

August 28, 2025
11 years of Pradhan Mantri Jan Dhan Yojana: More than 56 crore bank accounts opened, women's participation reaches 56 percent

प्रधानमंत्री जनधन योजनेची 11 वर्षे : 56 कोटींहून अधिक बँक खाती उघडली, महिलांचा सहभाग पोहोचला 56 टक्क्यांवर

August 28, 2025
Excessive use of mobile phones in children?, RSS chief Mohan Bhagwat suggested a solution, gave important advice to parents

मुलांमध्ये मोबाईलचा अतिवापर?, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितला उपाय, पालकांना महत्त्वाचा सल्लाही दिला

August 28, 2025
On the occasion of Ganeshotsav, the Cultural Affairs Department is organizing a reel competition, the first place will get a prize of one lakh rupees, what is the theme?

गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस, काय आहे थीम?

August 28, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page