• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगाव दौरा, केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी घेतला व्यवस्थेचा आढावा

विभागीय आयुक्तांनी केल्या सूचना; जिल्हाधिकाऱ्यांनी केले सादरीकरण

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
August 20, 2024
in जळगाव शहर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Raksha Khadse reviewed arrangements about PM Narendra Modi Jalgaon visit

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी घेतला आढावा

जळगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऐतिहासिक ‘लखपती दीदी’ या महिला मेळाव्याला येणाऱ्या महिलांच्या जेवणाची, पाण्याची, स्वच्छतागृहाची अत्यंत नियोजनबद्द सोय करावी, अशा सूचना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जळगाव महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा या कार्यक्रमाचे समन्व्यक आर. एस. लोखंडे, संबंधित यंत्रणांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पार्किंग व्यवस्थेबाबत अलर्ट रहा –

त्या त्या ठिकाणावरून येणाऱ्या बसेसची सोय, त्यांच्यासाठी सोयीची होईल अशीच करावी. याची जबाबदारी महानगरपालिकेची असली तरी पोलिसांच्या समन्वयाने ही पार्किंग केली जावी. या बाबत संबंधित यंत्रणांनी अलर्ट राहावे अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी दिल्या.

कार्यक्रम स्थळी बॅग, पाणी बॉटल आणू नयेत – 

कार्यक्रम स्थळी येताना सोबत कोणतीही बॅग किंवा पाणी बॉटल घेवून येऊ नयेत. इथे प्रत्येक सेक्टरवाईज पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भातील जबाबदारी असणाऱ्या विभागाने, व्यक्तीने हा संदेश द्यावा. प्रत्येक बसेसला क्रमांक द्यावेत, जेणे करून महिलांना त्यांच्या गाडे शोधणे सुलभ होईल अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. सर्वांनी दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावी, यानंतरही आपण याचा आढावा घेणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा, आणि कोणत्या विभागाची कोणती जबाबदारी राहिल या विषयी सादरीकरण केले.

कार्यक्रमस्थळाची पाहणी

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विमानतळाच्या समोर जिथे कार्यक्रम होणार आहे. तिथे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: minister raksha khadsenarendra modi jalgaon visitpm modipm narendra modiraksha khadse

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page