चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 10 एप्रिल : उन्मेष पाटील यांचे तिकिट का कापले गेले हे उन्मेश पाटील यांनाच विचारा, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते. यावरून उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मंत्री गिरीश महाजन यांनी मागील काही दिवसांत त्यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर जळगावात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
काय म्हणाले उन्मेश पाटील? –
उन्मेश पाटील पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले की, त्यांनी तिकिट कापले म्हणून याचे उत्तर त्यांनीच दिले पाहिजे होते. अनेक सारे प्रश्न प्रलंबित असताना, तुम्ही राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात तर तुम्ही तिकडेच लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या प्रलंबित असताना तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय?, कॅबीनेटच्या माध्यमातून खान्देशाला काय दिले?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
उन्मेश पाटील यांचा इशारा –
बीएचआर प्रकरणावरून मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत ते म्हणाले की, बीएचआर ही संस्था असून त्या संस्थेच्या ठेवेदारांना कुणी लुटले, याची चौकशी त्यांनीच केली पाहिजे. तुमची सत्ता म्हणून ऑडीट करा आणि तुम्हीच सगळे बाहेर आणा. जर मी खोलात गेलो ना तर पडता भुई थोडी होईल आणि त्यांना जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही. म्हणून यांनी बोलताना तोंड सांभाळून बोलले पाहिजे. मी व्यक्तीद्वेशी राजकारण करणार नसून अन्यायाविरोधात लढणार, असा इशारा उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2024 विशेष : सत्तेला आव्हान देणारा माणूस, उन्मेश पाटील!