जळगाव, 29 जानेवारी : जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील गोद्री याठिकाणी अखिल भारतीय गोरबंजारा, लभाणा-नायकडा महाकुंभ सुरु आहे. उद्या या महाकुंभाच्या मुख्य कार्यक्रमाला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच योगगुरू रामदेव बाबा याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
जामनेर येथे अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाजकुंभ 25 जानेवारी पासून सुरू आहे. उद्या महाकुंभाच्या मुख्य कार्यक्रमाला वरील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12 ते 3 या दरम्यान, हा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
महाकुंभासाठी 23 पासूनच भाविकांचे आगमन झाले आहे. महाराष्ट्रसह आणि अन्य सात राज्यातून समाजबांधवाचे, तसेच स्थानिक नागरिकांचे या महाकुंभामध्ये हजेरी लावत आहेत. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या दृष्टीने चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. हिंदू धर्मातून बंजारा समाज हा विखुरला जात आहे. म्हणून हा समाज विखुरला जाऊ नये, संपूर्ण समाज एकत्रित व्हावा यासाठी या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच योगगुरू रामदेव बाबा याठिकाणी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.