• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

“आमदारांच्या निष्क्रीयतेमुळे पाचोरा-भडगावला दुष्काळ जाहीर झाला नाही!”, वैशाली सुर्यवंशींचा हल्लाबोल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 21, 2024
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
सरकारविरोधात आंदोलन करताना महाविकास आघाडीतील पदाधिकारी

सरकारविरोधात आंदोलन करताना महाविकास आघाडीतील पदाधिकारी

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 21 जून : आमदार किशोर पाटील यांच्या निष्क्रीयतेमुळे पाचोरा-भडगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी केली. दरम्यान, शेतकर्‍यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

काय म्हणाल्या वैशाली सुर्यवंशी? –

शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महाविकास आघाडीच्यावतीने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष या घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या की, जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा सध्या खूप अडचणीत आहे. त्याच्या पिकाला भाव मिळत नाही. यातच, केंद्र व राज्य सरकारची धोरणे हे शेतकरी विरोधात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी हमी भाव देणार असल्याचे जाहीर करून देखील आतापर्यंत यावर निर्णय झाला नाही, असे त्या म्हणाल्या.

आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका –

वैशाली सुर्यवंशी पुढे बोलताना म्हणाल्या की, आमदार किशोर पाटील हे निष्क्रीय असल्याने मतदारसंघात दुष्काळ जाहीर झाला नसून शेतकर्‍यांची यामुळे हानी झाल्याची टीका केली. आमदार सत्तेत असून देखील शेतकर्‍यांना दिलासा देऊ शकले नसल्याचा टोला त्यांनी मारला. दरम्यान, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अरूण पाटील यांनी पीक विम्यावरून जोरदार टिकास्त्र सोडले. पीक विम्यात जिल्ह्यामध्ये दीडशे कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अजहर खान यांनी शेतीमालास योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. काँग्रेसचे नेते विठ्ठलराव गुंजाळ यांनी देखील सरकारवर टिकास्त्र सोडले.

आंदोलनात यांची होती उपस्थिती –

धरणे आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना सुपुर्द करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी यांच्यासह उध्दव मराठे, रमेश बाफना, अरूण पाटील, रतन परदेशी, राहूल पाटील, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अजहर खान, तिलोत्तमा मौर्य, पुष्पा बळीराम परदेशी, अरूण रूपचंद पाटील, हरीभाऊ तुकाराम पाटील, नंदकुमार श्रीधर सोनार, काँग्रेसचे अविनाश भालेराव, दीपक पाटील, बंडू मोरे, मनोहर चौधरी, संदीप जैन, हरीश देवरे, भूपेश सोमवंशी, निखील पाटील, प्रशांत पाटील, योगेश कासार, जितेंद्र बोरसे, भरत पाटील, शेख शकील शेख वासू, पुंडलीक पाटील, तुकाराम धनगर, नामदेव धनगर, अमोल गायकवाड, ऍड. प्रशांत पाटील, विनोद बाविस्कर, चेतन पाटील, पुनमचंद परदेशी, ऍड. अमजद पठाण, हरीशभाऊ पाटील, प्रेमराज पाटील, पंकज पाटील, कैलास आप्पा क्षीरसागर, अजयदादा तेली, प्रितेश जैन, भगवान पाटील, गुलाब पाटील, अमजद पठाण, ईस्माइल तांबोळी, भरत खंडेलवाल, संदीप प्रवीण ठाकरे, जे. के. पाटील, शशिकांत पाटील, संतोष पाटील, समाधान विश्‍वास पाटील, भारत शंकर पाटील, भाईदास माधवराव धुमाळ, शेख शकील शेख बाबू, पुंडलीक पांडुरंग पाटील, तुकाराम धर्मा धनगर, वसंत आबा बाविस्कर, धरमसिंग पाटील, गोकुळसिंग गांगुर्डे, नितेश पाटील, नवल राजपूत, पप्पू राजपूत, खंडू सोनवणे, सुभाष पुंडलीक राठोड, अनिल दगडू पाटील, नामदेव रामा धनगर, धीरज संजय ठाणगे, यश युवराज शिरसाठ, अमोल सुभाष गायकवाड आदी मान्यवरांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा : “मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित, पण….”, जामनेरच्या घटनेवरून मंत्री गिरीश महाजन यांचं महत्वाचं आवाहन

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: mahavikas aghadi protestmla kishor patilpachora newsvaishali suryawanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page