बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त करण्यात आला. या हत्या प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा दाखल आरोपपत्रात आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तसेच तोच या हत्येत मास्टरमाईंड असल्याचे आरोपपत्रात म्हणण्यात आले आहे.
सीआयडीने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात वाल्मिक कराड याचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तसेच एकूण आरोपींमध्ये वाल्मिक कराड हा आरोपी क्रमांक एक आहे. त्यानंतर आरोपपत्रात विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे.
मागच्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी आरोपी सुदर्शन घुले याच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला होता, असा उल्लेख आरोपपत्रात आहे. आवादा कंपनीकडे वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती आणि या खंडणीनंतर झालेल्या वादामध्ये संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे याच्याशी वाद झाला होता.
ही माहिती आता 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्ध पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये वाल्मीक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपपत्रामध्ये खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.
आरोपपत्रात एकूण किती आरोपी, कुणाचा नंबर कितवा –
वाल्मिक कराड – एक नंबर
विष्णू चाटे- दोन नंबर
सुदर्शन घुले – तीन नंबर
प्रतीक घुले – चार नंबर
सुधीर सांगळे – पाच नंबर
महेश केदार – सहा नंबर
जयराम चाटे – सात नंबर
फरार कृष्णा आंधळे – आठ नंबर