जळगाव, 21 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. तसेच राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी तयार झाली असून त्यांनी देखील 11 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मनसेने देखील 7 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. असे असताना वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
वंचितची पहिली यादी जाहीर –
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकांसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना हे तिकीट देण्यात आलं आहे. शमिभा या तृतीयपंथीय असून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार –
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितकडून रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना हे तिकीट दिले आहे. शमिभा या तृतीयपंथी उमेदवार असल्याने महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार म्हणून त्या विधानसभा निवडणूक लढणार आहेत. श्याम मीना भानुदास पाटील यांनी आता शमिभा हे नाव धारण केले आहे. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करत सामाजिक कार्यात सहभाग घेतला आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची सध्यास्थितीतील ओळख बनलीय.
कोण आहेत शमिभा पाटील? –
शमिभा पाटील ह्या वंचित बहुजन आघाडीच्या सक्रीय पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. राज्यातील तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक आणि मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी वयाच्या 30 व्या वर्षी त्यांची लैंगिक ओळख सार्वजनिक केली होती. त्यानंतर, जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीय समुदायाला एकत्र करण्याचे काम त्यांनी त्यांनी केले असून आजही ते सुरू आहे. तसेच तृतीयपंथीयांच्या शिक्षण हक्कासाठी त्या लढत आहेत. शमिभा पाटील या सामाजिक कार्यात अग्रेसर असतानाही शिक्षणाप्रती अतिशय संवेदनशील आहेत. दरम्यान, पीएचडीसारखी सर्वात मोठी पदवी मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असून ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे साहित्य हा विषय घेऊन त्या पीएचडी करत आहेत.
वंचितकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर –
- रावेर – शमिभा पाटील
- नागपूर साऊथ वेस्ट – विनय भांगे
- डॉ. आविनाश नन्हे – साकोली
- फारुख अहमद – दक्षिन नन्हे
- शिवा नरांगळे -लोहा
- विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद (संभाजीनगर)
- सिंधखेड राजा – सविता मुंडे
- वाशीम – मेघा डोंगरे
- धामगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
- किसन चव्हाण – शेवगाव
- संग्राम माने – खानापूर
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत