जळगाव, 2 ऑगस्ट : “विकसित महाराष्ट्र@2047” चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा राज्यस्तरीय कार्य बल गट (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आला आहे. यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गठित केलेल्या “विकसित महाराष्ट्र@2047” व्हिजन डॉक्युमेंट राज्याचे तयार करायचे आहे. या करिता राजस्तरीय कार्यबल गट गठित करण्यात आला आहे. या कार्यबल गटाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी असून या 13 सदस्यीय समितीमध्ये कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, कुलगुरू हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबई, डॉ. मुकुल सुतावणे, संचालक, भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था, प्रयागराज (उत्तरप्रदेश), डॉ. अरविंद रानडे, संचालक, नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन, गांधीनगर (गुजरात), महाव्यवस्थापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, डॉ. आनंद देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक, पर्सिस्टंट सिस्टीम, पुणे, डॉ. फारूक काझी, प्राध्यापक, वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्युट, मुंबई, डॉ. संजय वांढेकर, शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ केंद्र प्रमुख, सी-डॅक, पुणे, डॉ. मकरंद कुलकर्णी, प्राध्यापक, आय.आय.टी., मुंबई, संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी गटाची स्थापना –
सन 2029, 2035 व 2047 मध्ये येणाऱ्या आव्हाने उपलब्ध होणारे संधी व बदलणारे तंत्रज्ञान याचा विचार करून राज्याच्या प्रादेशिक विकासाला चालना देण्याकरिता प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ केंद्रस्थानी ठेवून कार्य बलाने व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली आहे.
हेही वाचा : Breaking! मनोज जरांगेंनी सोडलं उपोषण; शासनाने काढले जीआर, आंदोलकांचा जल्लोष