नवी दिल्ली, 13 डिसेंबर : नवी दिल्लीत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात काल लोकसभेत रस्ते अपघातातबाबत पंजाबमधील आपचे खासदार गुरमीत सिंग यांनी मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करत त्यांच्यासोबत झालेल्या अपघाताची घटना सांगितली. रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. मात्र, अपघाताची मालिका कमी होण्याऐवजी वाढत आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले.
नितीन गडकरी काय म्हणाले? –
रस्ते अपघातावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जगभरात लोक वेगाने वाहन चालवतात ही समस्या नाही. मात्र, भारतात लेन शिस्तभंगामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. योग्यरीत्या पालन होत नसल्याने व बेशिस्तपणामुळे देशात सर्वाधिक अपघात होत आहेत. दरम्यान, लोकांना, विशेषतः तरुणांना वाहतूक शिस्तीच्या नियमाबद्दल प्रबोधनाची तर लहान मुलांना नियमांचे महत्त्व पटवून देण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. दरम्यान, लोकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, यासाठी रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे गडकरी म्हणाले.
<strong
View this post on Instagram
>
अन् केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितली अपघाताची घटना –
लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना नितीन गडकरी पुढे म्हणाले की, रस्ते अपघातबाबत मी संवेदनशील आहे की, कारण मी ज्यावेळी महाराष्ट्रात विधानसभेत विरोधी पक्षनेता असताना पोलीस संरक्षणात मी जात असताना माझा मुंबईत अपघात झाला. त्यावेळी मी व माझे कुटुंबीय हे ट्रक अपघातात जखमी झाले होतो. तब्बल 2 वर्ष मी रुग्णालयात दाखल होतो. त्यामुळे मी रस्ते अपघातांबाबत अधिकच संवेदनशील आहे. दरम्यान, अपघाताची मालिका कमी होण्याऐवजी वाढत आहे. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने अपघाताची संख्या कमी करण्याच्या उद्दिष्टाला पुर्ण करू, असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला.
हेही वाचा : गुलाबराव देवकरांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर एकनाथ खडसेंची सावध प्रतिक्रिया; पाहा, VIDEO