• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाला वेग; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी घेतला आढावा, ‘या’ तीन तालुक्यांना होणार फायदा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 19, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, जामनेर, ताज्या बातम्या, पाचोरा
भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाला वेग; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी घेतला आढावा, ‘या’ तीन तालुक्यांना होणार फायदा

जळगाव, 17 ऑगस्ट : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगाव जिल्ह्यातील महत्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. या प्रकल्पामुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांचा मोठा दिलासा मिळणार आहे.

भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाची एकूण किंमत रुपये ३५३३.०५ कोटी असून शासन निर्णय क्रमांक ९२४/प्र.क्र.४३६/२४/मो.प्र.१, दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पत्रान्वये सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेतून जामनेर व पाचोरा तालुक्यातील ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांचे लाभक्षेत्र स्थिर केले जाणार असून एकूण ९८.३५ दलघमी पाणीसाठ्याचा उपयोग होणार आहे. त्याद्वारे जळगाव तालुक्यातील १३,९०४ हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळेल.

प्रकल्पाचे नियोजन दोन टप्प्यात करण्यात आले आहे. टप्पा-१ अंतर्गत जळगाव तालुक्यातील चिंचोली, कंडारी, उमाळे, पाथरी, धानवड, शिरसोली प्र. बो., दापोरे, जावखेडे, देव्हारी आदी २६ गावांतील १३,९०४ हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. तर टप्पा-२ अंतर्गत ४४.५ किलोमीटर लांबीच्या उद्धरण नलिकेद्वारे व १८,४६७ अश्वशक्तीच्या पंपांद्वारे ९८.३५ दलघमी पाणी उचलून जामनेर तालुक्यातील २२ लघु व २ मध्यम, पाचोरा तालुक्यातील २० लघु व ३ मध्यम तसेच जळगाव तालुक्यातील २ लघु अशा एकूण ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांमध्ये पाणी साठवले जाणार आहे.


यामध्ये कांग प्रकल्पाची उंची वाढ, गोलटेकडी ल.पा. प्रकल्प नव्याने तसेच एकुलती सा.त. प्रकल्प नव्याने उभारण्याचाही समावेश आहे. या टप्प्यातून १६,८६० हेक्टर क्षेत्राचे स्थिरीकरण होणार आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे. प्रकल्पाच्या कार्यान्वयनातील अडचणींचा आढावा घेऊन काम तातडीने सुरू करण्याच्या सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

या आढावा बैठकीस सेवा निवृत्त अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील, अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता श्री प्रल्हाद वराडे, उप अभियंता चंद्रशेखर खंबायत आदी अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील 5 तालुक्यात अतिवृष्टी; नुकसानग्रस्त भागाचे प्रशासनाकडून पंचानामे, आजचा हवामान अंदाज नेमका काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhagpur lift irrigation projectjalgaon newsminister girish mahajansuvarna khandesh livewater resources

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

June 10, 2026
महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

June 10, 2026
लोहटार येथे विशेष आरोग्य शिबिर; पंतप्रधान मातृत्व सुरक्षा अभियानांतर्गत 42 गरोदर मातांची तपासणी

लोहटार येथे विशेष आरोग्य शिबिर; पंतप्रधान मातृत्व सुरक्षा अभियानांतर्गत 42 गरोदर मातांची तपासणी

June 10, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ; निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ; निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

June 10, 2026
रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

June 9, 2026
बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

June 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page