• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon News : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन; जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला महत्वाचा सल्ला

जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 17, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Jalgaon News : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन; जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला महत्वाचा सल्ला

जळगाव, 17 जानेवारी : विद्यार्थ्यांनी सिगारेट व इतर व्यसनांपासून दूर राहावे, वाहतुकीचे नियम पाळावेत, आणि पोलिस दलात करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असा सल्ला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित शस्त्र, श्वान पथक, वायरलेस, पोलीस बॅण्ड, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन –
जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शस्त्र प्रदर्शना 7000 च्यावर विद्यार्थ्यांनी भेट देऊन पोलीसांशी संवाद साधला आणि शस्त्रांसंबंधित माहिती समजून घेतली. हा उपक्रम गेल्या 10 वर्षांपासून जळगावकरांसाठी आयोजित केला जातो. शस्त्र प्रदर्शनातून पोलीस दलाची ओळख झाली. शस्त्र प्रदर्शनात विद्यार्थ्यांना पोलीस दलातील अत्याधुनिक शस्त्रसामग्री, उपकरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलातील जबाबदाऱ्या आणि संधींबाबत उत्सुकता निर्माण झाली.

जळगावात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करताना एसपी डॉ महेश्वर रेड्डी
जळगावात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करताना एसपी डॉ महेश्वर रेड्डी

विद्यार्थ्यांना बीडीएस विभागातील प्रकाश महाजन, नरेंद्र ठाकूर, आशिफ पिंजारी, पंकज सोनवणे, रामदास साळुंखे, राखीव पोलीस दलातील आशिष चौधरी, दीपक पाटील, संतोष सुरवाडे, सुभाष धिरबस्सी, अजित तडवी यांच्यासह क्युआरटी टीम, आरसी प्लाटुन नं.७ मधील कर्मचाऱ्यांनी शस्त्रांविषयी माहिती समजून सांगितली. पोलीस बँड पथकाने विशेष सादरीकरण यावेळी केले.

डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन –
डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले,”पोलिस दलातील सेवा ही केवळ नोकरी नाही, ती समाजसेवेचे एक मोठे साधन आहे. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून यासाठी स्वतःला तयार करावे.” मोबाईलच्या अतिवापरापासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवावे, तसेच सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. “खोट्या कॉल्सना बळी पडू नका,” असेही त्यांनी स्पष्ट केले. चित्रपटांमधून पोलिसांविषयी जी चुकीची प्रतिमा निर्माण होते, ती बदलण्याचे आवाहन करताना डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले, पोलिसांचे खरे काम काय आहे, हे समजून घ्या. पोलिस दल समाजासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

शस्त्र प्रदर्शनासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एसपी डॉ महेश्वर रेड्डी
शस्त्र प्रदर्शनासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एसपी डॉ महेश्वर रेड्डी

संदीप कुमार गावित व अशोक नखाते यांनीही मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी छोटा पोलीस होऊन मुलांनी पालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे भावनिक आवाहन केले. विराज कावडिया यांनी उपक्रमाविषयी युवाशक्ती व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई फाऊंडेशन यांची भूमिका विशद केली. अरविंद वानखेडे यांनी सायबर क्राईम यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस व शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी आभार मानले. सुत्रसंचालन वायरलेस विभागातील अमित माळी यांनी केले. शहर वाहतुक पोलीस दलातील मेघना जोशी, शितल पाटील, वैशाली बाविस्कर, युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रितम शिंदे, सौरभ कुलकर्णी, योगेश कोळी, केवलनाथ, ओम खाचणे, अंजिक्य सपकाळे, रोहन कोळी, मंदार फालक यांनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.

यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीपकुमार गावित, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या पर्सोनेल विभागाचे वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट सी. एस. नाईक, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया उपस्थित होते. त्यासोबत शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, रामानंदचे राहुल गुंजाळ, तालुका पोलीस स्टेशनचे संजय गायकवाड, शहर पोलीस स्टेशनचे अनिल भवारी, मुख्यालयातील राखीव पोलीस उपनिरीक्षक मंगल पवार, पीएसआय राजेश वाघ यांच्यासह अधिकारी व पोलीस दलातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, नुतन मराठा, नंदिनीबाई बेंडाळे विद्यालय, मू.जे. महाविद्यालय, ला.ना. शाळा मधील एनसीसीचे विद्यार्थी, का.ऊ. कोल्हे महाविद्यालय, भगिरथ स्कूल, ओरियन सीबीएससी व स्टेट बोर्ड, प्रगती स्कूल, पुष्पावती खुशाल गुळवे विद्यालय, न्यु इंग्लीश स्कूल, विद्या इंग्लिश मिडीयम, मनपा शाळा नं. 10 ऊर्दू स्कूल, विवेकानंद स्कूल या शाळांसह सुमारे 7000 विद्यार्थ्यांनी दिवसभरात प्रदर्शनीला भेट दिली.

हेल्मेट जनजागृतीसाठी रॅली –
जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.मधील सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी मोटार सायकल रॅली ला हिरवी झेंडी दाखविली. पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरातून निघालेली मोटार सायकल रॅली नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, नेरी नाका, अंजिठा चौफुली, ईच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक मार्ग पोलीस मुख्यालय येथे समारोप झाला. हेल्मेट परिधान करून आमदार सुरेश भोळे, पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सह अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन हेल्मेट वापरा विषयी मोटार सायकल रॅलीतून जनजागृती केली.

हेही वाचा : बीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांची निर्घृणपणे हत्या, नेमकं काय प्रकरण?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjalgaon policemarathi newssuvarna khandesh liveweapons exhibition

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page