मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक असे यश मिळाल्यानंतर मात्र, 23 तारखेला लागलेल्या या निकालानंतर अद्यापही महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, याची अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजप विधीमंडळ पक्षनेत्याची निवड आज होत असल्याने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, आज ते नाव जाहीर केले जाणार आहे.
महायुतीचे नेते आज करणार सत्तास्थापनेचा दावा –
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थंमंत्री निर्मला सीतारमण या दोघांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही नेते काल रात्री मुंबईत पोहोचले. यानंतर आज सकाळी बुधवारी सकाळी विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आमदारांची बैठक होणार आहे. भाजपचा गटनेता निवडल्यानंतर महायुतीची बैठक होईल. यात नेत्याची निवड केली जाईल. यानंतर महायुतीचे नेते राजभवनात जाऊन राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा करतील.
कसा असणार आजचा घटनाक्रम –
- भाजपची आज विधिमंडळ पक्षनेता निवड
- सकाळी 10 वाजल्यापासून भाजपचे सर्व विजयी आमदार विधानभवनात पोहचणार
- सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण विधानभवनात पोहोचणार
- माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही याच सुमारास विधानभवनात पोचणार
- विधानभवनातील भाजपच्या कार्यालयात सर्व आमदार एकत्र येणार
- भाजपचे 132 विजयी आमदार यासोबतच भाजपला पाठिंबा असणारे अपक्ष आमदार उपस्थित राहणार
- भाजप मित्रपक्षाचा विधिमंडळ गटनेता कोण असावा याबद्दलचा प्रस्ताव भाजपतील ज्येष्ठ नेता ठेवणार
- चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा या ज्येष्ठ आमदारांपैकी एक जण प्रस्ताव मांडू शकतो
- केंद्रीय निरीक्षक या प्रस्तावावर उपस्थित आमदारांच मत जाणून घेतील
- याठिकाणी उपस्थित आमदारांपैकी प्रमुख ज्येष्ठ आमदार ह्या प्रस्तावावर आपलं अनुमोदनपर मत जाहीर करतील
- विधीमंडळ पक्षनेत्याच्या नावावर बहुतमतानं शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक भाजप गटनेत्याच नाव जाहीर करतील
- सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याची प्राथमिक माहिती
- उपस्थित आमदारांपैकी ज्येष्ठ आमदार नियुक्त पक्षनेत्याबद्दल आपली मते व्यक्त करतील
- विधीमंडळ पक्षाचा नेता निवड झाल्यानंतर भाजप महायुतीच्या सरकार स्थापनेच्या पुढील हालचालींना वेग येईल
cm eknath shinde : एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून शेवटची बैठक, काय होता बैठकीचा विषय?