जळगाव, 29 नोव्हेंबर : राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीचा गारठा वाढला असून तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर पुर्व दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील तापामात पार घसरला आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्रात कडाक्याची थंडी –
डिसेंबरमध्ये हुडहुडी भरविणारी थंडी ही यंदा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पडत आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविले जात आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस किमान तापमान खाली राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
कृपया, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
युट्यूब चॅनल लिंक – https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
आज महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा –
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील तापमान हे 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविण्यात येत आहे. दरम्यान, उत्तर मध्य महाराष्ट्राला शुक्रवारीही दिलेला थंडीच्या लाटेचा इशारा हा कायम असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
जळगावचा हवामान अंदाज नेमका काय? –
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. असे असताना जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडी कायम असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील पुढील पाच दिवसांचे तापमान खालीलप्रमाणे असणार आहे.
- 29 नोव्हेंबर – कमाल तापमान – 29 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 10 अंश सेल्सिअस
- 30 नोव्हेंबर – कमाल तापमान – 29 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 12 अंश सेल्सिअस
- 1 डिसेंबर – कमाल तापमान – 28 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 13 अंश सेल्सिअस
- 2 डिसेंबर – कमाल तापमान – 28 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 14 अंश सेल्सिअस
- 3 डिसेंबर – कमाल तापमान – 28 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 14 अंश सेल्सिअस
हेही वाचा : दानवेंचे ‘ते’ वक्तव्य अन् मुंबईत गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?