ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 10 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे शनिवार 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरूवातीला रॉबिनहूड तंट्या मामा भिल्ल, दंडनायक वीर एकलव्य, जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन सातगाव डोंगरी गावातील तडवी भिल्ल समाजातील महिलांच्या वतीने करण्यात आले. तसेच सदरील कार्यक्रमात सातगाव डोंगरी गावातील चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सदरील प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर लहान-मोठे, आबालवृद्ध यांनी पारंपरिक पद्धतीने पेहराव करून नाच गाण्यात सामील झाले. यावेळी परिसरात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी जामनेर तालुक्यातील ढालगाव, राहेरा, मांडवे, फत्तेपूर, पहुर तसेच सोयगाव तालुक्यातील घोसला, नांदगाव, निंबायती, फर्दापूर, बहुळखेडा, कवली गावातील तसेच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर, मोंढाळे, वाडी शेवाळे, गहुले, शिंदाड, निंभोरी, लासुरे, भोजे, खडकदेवळा, वाणेगाव येथील युवक व आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम सातगाव डोंगरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील तडवी ग्रुप कमेटी वतीने अशोक मानखा तडवी, संजय शरीफ तडवी, सत्तार मद्देखा तडवी, जाकीर सोना तडवी, जाबीर आमीन तडवी, निसार बुढन तडवी, आलीम जमाल तडवी, आलीम अब्बास तडवी, अझरुद्दीन समसुद्दीन तडवी, बाळू समशेर तडवी तसेच ग्रामपंचायत सदस्य शकिलाबाई अब्बास तडवी यांच्यासह सर्व आदिवासी समाजातील युवकांनी कार्यक्रमाचे नियोजनासाठी परिश्रम घेतले. महिलावर्गासाठी यांनी मेहनत घेतली.
सदरील कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडण्यात आला. सदरील अभिवादन प्रसंगी तडवी ग्रुप कमेटी चे संजय शरीफ तडवी,जाबीर आमीन तडवी, सत्तार मद्देखा तडवी,अशोक मानखा तडवी,जाकीर सोना तडवी, अमित मानखा तडवी (वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य), गजानन भाऊ लाधे (पत्रकार व संचालक ठिबक सिंचन),सुनील भाऊ डांबरे,विलास भाऊ डांबरे (इंद्रायणी ग्रुप सातगाव डोंगरी) हे उपस्थित होते.